आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्री-पुरुष समानतेचा मार्ग सांगणारा बुद्ध धर्म - प्रा. सुशीला मूल-जाधव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पंचशील आणि अष्टांगिक मार्गांचे जे पालन करतील ते भविष्यात सुखी आणि आनंदी राहतील. बुद्ध धर्माने जगाला शांती, मौन आणि आनंदाची शिकवण दिली आहे. जगात स्त्री-पुरुष समानता आणि विज्ञानवादी तत्त्वाचा मार्ग अवलंबणारा धर्म म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला, असे मत प्रा. सुशीला मूल-जाधव यांनी व्यक्त केले.

बोधिसत्त्व प्रतिष्ठानच्या वतीने भगवान गौतम बुद्ध यांची 2557 वी जयंती साजरी करण्यात आली त्या वेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर डॉ. गंगाधर पानतावणे, प्रा. एस. एस. वाझ्वे, प्रा. टी. पी. तायडे यांची उपस्थिती होती. प्रा. मूल-जाधव म्हणाल्या की, बाबासाहेबांनी मानवमुक्तीचा लढा दिला. त्यांनी फक्त बौद्ध धर्म विकासाच्या दृष्टीने विचार मांडले असे नाही, तर प्रत्येक समाजाने आचरावे असे विचार त्यांनी विश्वाला दिले. डॉ. पानतावणे यांनीही मार्गदर्शन केले. प्रा. वाझ्वे यांनी प्रास्ताविक केले, तर प्रमोद खोब्रागडे यांनी सूत्रसंचालन केले. अँड. वसंत बोरकर, प्रा. टी. पी. तायडे, डॉ. के. एम. गेडाम, अँड. एस. सी. डोंगरे अँड. जे. के. नारायणे, अँड. किशोर डोंगरे , विजय काणेकर, प्रवीण निरंजन यांची उपस्थिती होती.