आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिल्डरकडून रहिवाशांची फसवणूक , ग्राहक मंचाच्या आदेशाला केराची टोपली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - रांजणगावलगतओमसाई कन्स्ट्रक्शन वसाहत उभारून चार वर्षे पूर्ण झाली आहेत. यात ५०० पेक्षा अधिक वन बीएचके रोहाऊस तसेच वन आरके घरे बांधण्यात आली. बिल्डरने ग्राहकांना मोठी आश्वासने दिली होती. विविध कारणास्तव ग्राहकांकडून मूळ रकमेच्या दुप्पट दाम घेऊनही रहिवाशांना सुविधा दिल्या नसल्यामुळे नागरिकांनी थेट जिल्हा ग्राहक मंचाकडे धाव घेतली.

या प्रकरणाच्या सुनावणीनंतर ग्राहकांची वाढीव रक्कम व्याजासह परत करण्याचे आदेश ग्राहक मंचाने बिल्डर सुभाष औताडे यांना दिले. मात्र, त्यांनी मुदत पूर्ण होऊनही रक्कम परत केली नसल्यामुळे पुन्हा रहिवासी ग्राहक मंचाकडे धाव घेणार आहेत. प्रसंगी फौजदारी खटला दाखल करणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.

रहिवासी नागरिकांमध्ये रत्नाकर यादव, प्रभाकर शिंदे, शिवाजी जोगदंड, समाधान गायकवाड, सुभाष दाभाडे, शिवाजी पाटील, नंदकुमार दात्रक, नाना पिसे, लक्ष्मण शिंदे यांचा समावेश आहे. या संदर्भात कन्स्ट्रक्शनचे मालक सुभाष औताडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही.

बांधकाम निकृष्ट
घराचेबांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने पहिल्याच पावसात छत गळायला लागले. बांधकामामध्ये सिमेंट गट्टूंचा वापर केल्यामुळे बांधकाम पक्के झाले नाही. भविष्यात घर पडते की काय याची भीती वाटते. विलासकाळे, रहिवासी

आदेश मानत नाही
रजिस्ट्रीहवी असेल तर आणखी पैसे लागतील, असे सांगून जास्तीची रक्कम घेतली. ती व्याजासह परत करण्याचे आदेश आहेत, मात्र तो या आदेशाला मानत नाही. लवकरच फौजदारी गुन्हा दाखल करू. बालासाहेबपवार, रहिवासी

शेकडो नागरिकांची फसवणूक
आमच्याप्रमाणेचशेकडोंची फसवणूक करणारा बिल्‍डर मुक्तपणे वावरत आहे. आम्हाला न्याय मिळत नाही. मोलमजुरी करून घर खरेदीसाठी पै-पै गोळा करून दिला. मात्र, सुविधा मिळत नाहीत. - नागोराविचकणे, रहिवासी