आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नातेवाइकानेच पाडले घर; प्राचार्या विजया पातूरकर यांचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मछली खडकवरील एका तीनमजली इमारतीचा काही भाग गुरुवारी कोसळल्याने सुमारे तीन तास या भागातील वाहतूक ठप्प झाली होती, तर वीजपुरवठाही बंद पडला होता. मनपाने ही इमारत धोकादायक जाहीर केली असली तरी आपल्या भावानेच शेजार्‍याच्या संगनमताने हे घर पाडल्याचा आरोप एमजीएम कॉलेज ऑफ फाइन आर्टच्या प्राचार्या विजया पातूरकर यांनी केला आहे. या घराचा वाद न्यायालयात सुरू असताना हा प्रकार घडल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मछली खडक भागातील उत्तम मिठाई सेंटरशेजारील पातूरकर यांच्या तीनमजली इमारतीचा काही भाग गुरुवारी दुपारी कोसळला. हा भाग दारासमोरच्या विजेच्या खांबावर कोसळल्याने खांब वाकडा झाला व वीजपुरवठा खंडित झाला. मनपाने इमारतीला सील केले, तर विजेच्या तारांच्या जोडणीचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते. या पडझडीत कुणीही जखमी झाले नाही.

मनपाच्या माहितीनुसार, ही इमारत 19 धोकादायक इमारतींच्या यादीतील आहे. या इमारतीच्या मालकांना नोटीस देण्यात आली होती; पण त्यांनी ती इमारत सील करू दिली नाही.

यासंदर्भात पातूरकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांचा भाऊ नितीन पातूरकर यांनी शेजारी दीपक पूनमचंद भाटी यांच्याशी संगनमत करून घर पाडले आहे. वडिलांच्या घरात आपण 22 वर्षांपासून राहत आहे. उत्तम उपाहारगृहाला हे घर विकण्यासाठी भावाचे प्रयत्न सुरू त्यामुळेच घराचा असून त्यातूनच शेजार्‍यांच्या मदतीने हे घर राहण्यालायक नाही, असे मनपाला सांगून त्या घराचा ताबा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. या आधीही यासंदर्भात सिटी चौक पोलिस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी चॅप्टर केस करून तुम्हाला भाटी यांच्या बांधकामात अडथळा निर्माण केला म्हणून अटक करू, असे सांगत केस मागे घ्यायला भाग पाडले, मात्र आपल्यावर केलेली पोलिस केस मागे घेण्यात आली नाही, असे निवेदनात म्हटले आहे.