आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमिशनच्या वादातून गोळीबार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भागीदारीमध्ये भूखंड खरेदी-विक्री व्यवहार करणार्‍यांत कमिशनवरून झालेल्या वादात शिवसेनेचे माजी नगरसेवक बाळासाहेब ऊर्फ दत्तात्रय थोरात यांनी सहकार्‍यावरच गोळीबार केला. यात एकाच्या पायात गोळी घुसली असून नगरसेवकावरही तलवारीने हल्ला करण्यात आला. एकमेकांना भिडलेले दोघेही शिवसैनिक आहेत. त्यांच्याही उजव्या हातावर जखम झाली आहे. दोघांच्याही तक्रारीवरून गुन्हे दाखल झाले असून पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे. हा प्रकार मंगळवारी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास सुरेवाडीतील ऑडिटर सोसायटीनजीक घडला.

थोरात यांनी दोन गोळ्या हवेत फायर केल्या, तर तिसरी गोळी माझ्या पायावर झाडली, असा आरोप अशोक औताडे यांनी केला आहे. सिडको पोलिसांनी औताडे यांच्या पोटरीला (उजवा पाय) गोळी चाटून गेल्याचे सांगितले. थोरात यांचे रिव्हॉल्व्हर आणि तेरा जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. पंधरा दिवसांपूर्वी थोरात यांनी पुढाकार घेत प्लॉट विक्री केली होती. या व्यवहारात सुनील साईनाथ औताडे आणि अशोक औताडे थोरात यांच्यासोबत होते.

या व्यवहारात थोरात यांना कमिशनपोटी 36 लाख रुपये मिळाले. यानंतर सुनील आणि अशोक यांना प्रत्येकी दोन लाख रुपये थोरात यांनी दिले. कमिशनपोटी साडेसतरा लाख रुपये मिळावेत, अशी मागणी औताडे यांनी केली होती. त्यांनी यासाठी थोरातांकडे तगादा लावला होता. थोरात गेल्या तीन दिवसांपासून मुंबईला गेले होते. दरम्यानच्या काळात औताडे यांनी त्यांना अनेकदा मोबाइलवरून कॉल करून पैसे मिळावेत यासाठी तगादा लावला होता. सोमवारी नेहमीप्रमाणे संपर्क साधल्यानंतर थोरात यांनी पैसे देत नाही, काय करायचे ते करा, असे उलट उत्तर दिल्याने औताडे भडकले. मंगळवारी थोरात औरंगाबादेत आल्याचे कळताच त्यांनी सुरेवाडीतील हरसिंद सोसायटीलगत असलेले थोरातांचे घर गाठले.

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या सुनिल आणि अशोक यांची थोरात मध्ये बाचाबाची झाली. औताडे यांनी तलवारीने थोरात यांच्या उजव्या हातावर वार केला. त्यास प्रत्युत्तर देत थोरात यांनी त्यांच्याजवळच्या रिव्हॉल्व्हरमधून दोन गोळय़ा हवेत झाडल्या. फायर केलेली तिसरी गोळी अशोक औताडे यांच्या पायाला चाटून गेली. थोरात जखमी अवस्थेत लगेच पत्नीसह सिडको पोलिस ठाण्यात गेले. तक्रार दिल्यानंतर शरद टी पॉईन्टवरील सिध्दीविनायक रूग्णालयात दाखल झाले. तर अशोक औताडे यांना घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आले.

वरिष्ठ अधिकार्‍याच्या भेटी
भरदुपारी झालेल्या गोळीबाराचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस उपायुक्त अरविंद चावरिया, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय पवार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिस उपनिरीक्षक गणेश धोकट्र आणि सुनिल बडगुजर यांनी सायंक ाळी थोरात यांचा जबाब नोंदविला. सुनिल आणि अशोक औताडे यांच्या चार- पाच सहकार्‍यानी माझ्यावर तलवारीने हल्ला चढवला आणि दोन तोळ्याची सोनसाखळी आणि पंधरा हजाराचा मोबाईल हिसकावला असे थोरात यांनी जबाबात म्हटले आहे.

सशस्त्र संघर्षाने नगसेवकांची गर्दी
थोरात आणि अशोक औताडे यांच्यात सशस्त्र संघर्ष उडाल्याचे झाल्याचे कळताच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे काही नगरसेवकांसह मुन्ना त्रिवेदी, राजू दानवे, महेश माळवतकर, हुशारसिंग चव्हाण, राज वानखेडे, बन्सी गागवे,किशोर नागरे,मोहन मेघावाले, गणपत खरात, अँड.गणेश वानखेडे रुग्णालयात दाखल झाले. शिवसेनेच्या विविध पदाधिकार्‍यांसह इतर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यानी थोरात यांची विचारपुस केली.

दोघेही पोलिसांच्या नजरकैदेत
सशस्त्र संघर्षात जखमी झालेले दोन्ही शिवसैनिक पोलिसांच्या नजरकैदेत असून त्यांच्यावर पहारा ठेलण्यासाठी सिडको पोलिसांचे दोन पथक तैनात करण्यात आले आहेत. थोरात यांच्या तक्रारीवरून औताडेंवर दरोड्याचा गुन्हा तर औताडे यांच्या तक्रारीवरून थोरात यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पैसा, वर्चस्वाच्या वादातून हाणामारी
मी सुद्धा शिवसेनेचा सच्चा कार्यकर्ता आहे. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नावाने धमकावत नेहमी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब थोरात आमच्यावर वर्चस्व गाजवत आहेत. म्हसोबा नगरातील प्लॉट थोरात यांना 40 लाख रुपयात विक्री करण्यात आला आहे. या पैशांपैकी त्यांनी केवळ 4 लाख रुपये अद्यापपर्यंत दिलेले आहेत. आणखी 36 लाख रुपये घ्यायचे असल्याने आज दुपारी अडीचच्या सुमारास मी आणि अशोक औताडे कारने (एमएच-20-सीएच-7779) थोरात यांच्याकडे गेलो होतो.

या वेळी त्यांच्यासह पुतण्या अभिजीत आणि भावाने दोघांवर हल्ला केला. माझ्या डोक्यात बॅट मारली तर थोरात यांनी हवेत तीन फैरी झाडून एक गोळी अशोकच्या उजव्या पायावर झाडली. यानंतर मी दादाराव औताडे, रहिम पटेल, लक्ष्मण औताडे आणि संजय औताडे यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी आम्हाला घाटीत दाखल केले, अशी माहिती सुनील औताडे यांनी दिली.

सुरेवाडी, जाधववाडीत दहशत
सुनील आणि अशोक औताडे यांची सुरेवाडी, हसरूल आणि जाधववाडी परिसरात दहशत आहे. त्यांनी माझ्यावर हल्ला का केला हे माहीत नाही. आपली दहशत या भागात राहावी म्हणून या टोळीने काही महिन्यांपूर्वी ऑडिटर सोसायटीत एका वकिलाच्या घरावर हल्ला केला होता. सुनील हा पोलिस मुख्यालयात कार्यरत हेडकॉन्स्टेबल साईनाथ औताडे यांचा मुलगा आहे.