आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bullet Fire Over The Commission : Thorat's Bullet Handover The Forensic Lab

कमिशनवरून गोळीबार प्रकरण : थोरातांचे पिस्तूल न्यायवैद्यक शाखेकडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भागीदारीत भूखंड खरेदी-विक्रीचा व्यवहार केल्यानंतर कमिशनवरून वाद झाल्यानंतर गोळीबार करणारे शिवसेनेचे माजी नगरसेवक बाळासाहेब थोरात यांचे पिस्तूल तपासणीसाठी पोलिसांनी न्यायवैद्यक शाळेकडे पाठवले आहे. त्याचप्रमाणे त्यांचे केमिकलद्वारे हँड वॉश करण्यात येत असून तेही न्यायवैद्यक शाळेत पाठवण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रताप बाविस्कर यांनी दिली.

प्लॉटचा खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्यानंतर मिळालेल्या कमिशनची रक्कम देण्यात यावी यासाठी सुनील आणि अशोक औताडे मंगळवारी दुपारी थोरात यांच्या घरी गेले होते. जेवण करत असताना मद्यधुंद अवस्थेत असलेल्या सुनील आणि थोरात यांच्यात पैशावरून वाद झाला होता. या वेळी सुनील आणि अशोकने थोरात व त्यांच्या मित्राला मारहाण केली. आपसात नातेवाईक असल्याने थोरात यांनी सुनीलचे वडील साईनाथ औताडे यांना घटनेची माहिती दिली होती. यानंतर साईनाथ औताडेंनी थोरात यांचे घर गाठले. त्यानंतर वाद मिटवण्यासाठी दोघेही औताडेंच्या घरी निघाले होते.

याचदरम्यान थोरात यांच्या भावाने व पुतण्याने सुनील आणि अशोकला पाहून मारहाणीसाठी त्यांच्या दिशेने धाव घेतली होती. तेही अंगावर धावत आल्याने थोरात यांनी जमिनीवर तीन गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी अशोक औताडेंच्या उजव्या पायाला लागली. औताडे यांनी पोलिसांना दिलेल्या जवाबात तथ्य नसून प्लॉटच्या कमिशनवरून कोणताच वाद नव्हता असे थोरात यांचे म्हणणे अशी माहिती पोलिस निरीक्षक विठ्ठलसिंह राजपूत यांनी बुधवारी दिली.

असे ठरले होते वाटे-हिस्से
साईनाथ आणि त्यांच्या भावाच्या नावे असलेला सहा हजार स्क्वेअर फुटांचा प्लॉट काही दिवसांपूर्वी सुनील, अशोक आणि थोरात यांनी 78 लाखांत विकत घेतला होता. हा प्लॉट विक्री करून त्यामधून मिळणार्‍या नफ्याची आपसात वाटाघाटी करण्याचे ठरले होते. यानंतर तिघांनी हा प्लॉट एकाला एक कोटी दोन लाख रुपयांत विक्री केला. यातून 24 लाख रुपयांचा नफा झाला. ही रक्कम थोरात यांनी स्वत:कडे ठेवली होती. मिळालेल्या रकमेपैकी केवळ दोन लाख रुपये थोरात यांनी औताडेंना दिले होते. उर्वरित नफ्यावरून त्यांच्यात वाद सुरूहोता. थोरात पैसे देत नसल्याने घरी गेल्याचे सुनील औताडे यांनी जबाबात म्हटले आहे.