आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावठी कट्टे तयार करणारी मध्य प्रदेशातील टोळी केली जेरबंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील बहुतांश प्रकरणांत जप्त करण्यात आलेले गावठी कट्टे हे मध्य प्रदेशातून आणले असल्याची कबुली आरोपींनी दिली होती. त्यानुसार गावठी कट्टे तयार करणाऱ्या मध्य प्रदेशातील टोळीतील आणखी दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले, अशी माहिती पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. या टोळीच्या ताब्यातून चार गावठी कट्टे जप्त करण्यात आली आहेत. प्रल्हादसिंग गुलजारसिंग भाटिया (४२) आणि अरविंदसिंग प्रल्हादसिंग भाटिया (२०) अशी आरोपींची नावे आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १६ सप्टेंबर २०१५ रोजी पैठण - औरंगाबाद रस्त्यावरील इसारवाडी फाट्यानजीक दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना गजाआड केले होते. त्यांच्या ताब्यातून गावठी कट्टे आणि १६ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. पोलिस कोठडीदरम्यान शेख आरिफ, खुर्शीद पठाण आणि शेख सादिक या तिघांनी हे गावठी कट्टे मध्य प्रदेशातून आणल्याचे सांगितले. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक डॉ. कांचनकुमार चाटे, पोलिस उपनिरीक्षक दीपक सरोदे, महेश आंधळे, दिलीप मगरे, विकास चौधरी, नवनाथ कोल्हे, जावेद शेख यांचे पथक धार जिल्ह्यातील सिंधान येथे रवाना झाले. शेख आरिफने गावठी कट्टा विकणाऱ्या प्रल्हादसिंग गुलजारसिंग भाटियाशी संपर्क साधून त्याला बसस्थानकावर बोलावून घेतले.
प्रल्हादसिंग आल्याचा इशारा शेख आरिफने पोलिसांना करताच त्यांनी भाटियाला पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ गावठी कट्टा सापडला. प्रल्हादसिंग आणि त्याचा २१ वर्षीय मुलगा अरविंदसिंग भाटिया या दोघांच्या ताब्यातून ८३ हजार रुपये किमतीचे चार या प्रकल्पातून नियमित २५०० लिटर ऑइल तयार होते. प्रक्रिया करण्यासाठी आयएमएने स्वतंत्र ठेकेदार नेमला आहे. प्रक्रियेतून उत्पन्नातून १० ते १२ टक्के रॉयल्टी मनपाला द्यावी लागते.

आयआयएमची बैठक घेणार : ड्रेनेजचेपाणी शुद्ध करण्याचा प्रकल्प राबवण्यासाठी क्रेडाईला तेथे जाऊन माहिती घेण्याचा सल्ला दिला जाणार आहे. तसेच शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी आयआयएमची बैठक पुढील आठवड्यात घेण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती प्रमोद राठोड यांनी दिली.

छायाचित्र: गावठी कट्ट्यांची पाहणी करताना पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, पोलिस निरीक्षक डॉ. चाटे.