आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापार्‍याचे घर फोडून 90 हजारांचा ऐवज लंपास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरात चोरांनी उच्छाद मांडला असून चोरांची दिवाळी जोरात सुरू आहे. हसरूल परिसरातील बेरीबाग येथील व्यापारी कुटुंबासह बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरांनी त्याचे घर फोडून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास केल्याची घटना शुक्रवारी (1 नोव्हेंबर) सकाळी नऊ वाजता उघडकीस आली.

बेरीबाग येथील रहिवासी शेख हबीब शेख नजीर हे 30 ऑक्टोबर रोजी कुटुंबासह जालना जिल्ह्यातील हसनाबाद येथे गेले होते. घरी कुणी नसल्याची संधी साधून चोरांनी मुख्य प्रवेशद्वाराचा कडी-कोयंडा तोडत आत प्रवेश केला. बेडरूमच्या कपाटातील सव्वा तोळय़ाचे कानातील रिंग, पोत आणि 20 हजार रुपये असा 90 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना शुक्रवारी सकाळी घरी परतलेल्या शेख यांच्या निदर्शनास आला. त्यांनी बेगमपुरा पोलिसांशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. श्वानपथकाने चोरांचा हसरूलच्या मुख्य रस्त्यापर्यंत माग काढला. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आर. टी. जेधे करीत आहेत.