आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Burned Housewife; Husband, Mother in law, His Father In Law Life

विवाहितेला जाळले; पती, सासू, सासऱ्याला जन्मठेप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पत्नीला जाळल्याप्रकरणी पतीसह सासू-सासऱ्यांनाजिल्हा सत्र न्यायाधीश एम. व्ही. देशपांडे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. साईनाथ वाघचौरे (३६) अण्णासाहेब वाघचौरे (६३) आणि द्वारकाबाई वाघचौरे (५५) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी पैठण तालुक्यातील धुपखेड्याचे रहिवासी आहेत. या प्रकरणात विवाहितेचा मृत्युपूर्व जबाब महत्त्वाचा ठरला. यशोदा साईनाथ वाघचौरे असे मृत विवाहितेचे नाव आहे.
यशोदा आणि साईनाथ यांचे १९९७ मध्ये लग्न झाले होते. त्यांना दोन अपत्ये आहेत. २२ ऑक्टोबर २०१२ रोजी एक लाख रुपयांसाठी सासू द्वारकाबाई हिने तिचे दोन्ही हात धरले आणि अण्णासाहेब याने ितच्या अंगावर रॉकेल ओतले. त्यानंतर पती साईनाथ याने तिला पेटवून दिले. पेटलेल्या अवस्थेत यशोदा किंचाळत बाहेर आली. शेजारी लक्ष्मण वाघचौरे यांनी आग विझवली