आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बस-अॅपेरिक्षाच्या अपघातात तीन ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उमरगा- लक्झरी बस व अॅपेच्या अपघातात तिघेजण ठार झाले. ही घटना शनिवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास शहरापासून दोन किलोमीटरवर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील भागीरथी हॉटेलसमोर घडली. हैदराबादहून सोलापूरकडे जाणाऱ्या खासगी लक्झरी बसने (केए ३९ - ७५३६) भरगाव वेगात तुरोरीकडे जाणाऱ्या अॅपेरिक्षाला (एमएच २५, एन ७८२) जोराची धडक दिली. रिक्षामधील बाळू शिंदे (रा. कराळी), सचिन सूर्यवंशी (२५) राजेंद्र जाधव (२२, दोघे रा. तुरोरी) यांचा मृत्यू झाला. दोघांचा जागीच तर एकाचा सोलापूरला उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. अपघातात अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये मयंक बिराजदार (रा. उमरगा) व अमोल शिवाजी चव्हाण (रा. गंुजोटी) यांचा समावेश असून त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अमोल चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हैदराबादहून सोलापूरकडे जाणाऱ्या खासगी लक्झरी बसने तुरोरीकडे जाणाऱ्या अ‍ॅपेरिक्षाला जोराची धडक दिली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला.