आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेक लावताच बसच्या काचेतून बाहेर फेकला गेल्याने युवकाचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - वैजापूर-पुणे बस व ट्रकच्या धडकेत एका २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. बसमधील ८ प्रवासी जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास नागपूर-मुंबई महामार्गावरील गंगापूर चौफुलीवर घडली. मजहर शहा तायर शहा (२२, रा. शहाबाजपुरा) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
वैजापूरहून गंगापूरमार्गे पुण्याकडे जाणारी बस (एमएच २० बीएल ३००३) ही सकाळी ६ वाजता बसस्थानकातून मार्गस्थ झाली. त्याच वेळी नागपूर-मुंबई हायवे रस्त्यावरून औरंगाबादकडे जाणाऱ्या ट्रक (एमएच १२ एचडी ३३५) मध्ये धडक झाली. बसचालकाने जोरात ब्रेक लावल्याने त्याच्या लगतच्या आसनावर बसलेला मजहर हा पुढच्या काचेतून बाहेर फेकला गेला. यात तो जागीच गतप्राण झाला. तर बसचालक विजय राऊत (३२), प्रवीण मराठे (३६), कांताबाई वाघ (४५), रूपाली शेलार (३०), कमलेश अधिकार (२९), गायत्री अधिकार (२०), पवन चांडक (१८) व अन्नपूर्णा साठे (६०) हे प्रवासी जखमी झाले आहेत.
शहा कुटुंबीयांवर शोककळा
मजहर शहा बसने गंगापूरला जाण्यासाठी निघाला होता. नेहमीचा प्रवासी असल्याने तो चालकाच्या केबिनमध्ये असलेल्या आसनावर बसला. घरापासून अवघ्या काही अंतरावर जात नाही तोच अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
शहा कुटुंबीयांवर शोककळा
मजहर शहा बसने गंगापूरला जाण्यासाठी निघाला होता. नेहमीचा प्रवासी असल्याने तो चालकाच्या केबिनमध्ये असलेल्या आसनावर बसला. घरापासून अवघ्या काही अंतरावर जात नाही तोच अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
बातम्या आणखी आहेत...