आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसचालकाची सजकता, 40 प्रवाशांचे वाचले प्राण; ब्रेक फेल झाल्याने गाडी झाडाझुडपात थांबवली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - देवगिरी किल्ल्याजवळ दख्खनचा दरवाजा आहे. या दरवाजाजवळ महामंडळाची बस आली. पण समोरून मोठे वाहन येत असल्याचे चालकाच्या निदर्शनास येताच त्याने तातडीने ब्रेक दाबून बस थांबवण्याचा प्रयत्न केला. पण ब्रेक लागत नसल्याचे कळताच त्याने प्रसंगावधानाने बस दरवाजाच्या बाजूला शेतातील झाडाझुडपात नेली आणि ४० प्रवाशांचे प्राण वाचवले. हा चित्तथरारक प्रसंग रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला.
 
औरंगाबाद डेपोची एमएच २० डी ८३२४ ही बस औरंगाबादहून ४० प्रवासी घेऊन कन्नडकडे जात होती. ब्रेक लागत नसल्यामुळे चालक संजय धनसिंग बैनाडे घाबरून गेले नाहीत. त्यांनी मोठ्या हिमतीने बस दरवाजाच्या बाजूला नेली. प्रवासी ओरडले, असे का घडले याचे कारण समोर आल्यानंतर प्रवासी आश्चर्यचकित झाले. काही जण घाबरले, पण चालकाने त्यांना धीर दिला. प्रवासी बसमधून खाली उतरले आणि चालकाचे आभार मानले.
 
सर्वच जण सुखरूप
चालकानेही बाब आपल्या वरिष्ठाला कळवल्यानंतर दुसरी बस पाठवण्यात आली आणि पुढील प्रवास सुरू झाला. दरम्यान, घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती. याप्रकरणी दौलताबाद पोलिसांनी जाम झालेली वाहतूक सुरळीत केली. एकाही प्रवाशाला दुखापत झाली नाही.
 
बातम्या आणखी आहेत...