आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौताळा घाटात बस-दुचाकीचा अपघात, एक ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नड - बस-दुचाकीच्या झालेल्या अपघातात २८ वर्षीय युवक ठार झाला. ही घटना गौताळा घाटात घडली. सुलतान निसार पठाण (कुंजखेडा)असे त्याचे नाव आहे. चाळीसगावहून सिल्लोडकडे जाणारी बस (एमएच.२०. बी.एल.१८७२) व कन्नडहून चाळीसगावकडे जाणाऱ्या दुचाकीचा (एमएच.१४ जी.एफ. ६८०२) गणपती टेकडीजवळ अपघात झाला.
यात दुचाकीस्वार सुलतान निसार पठाण ठार तर रफिक शब्बीर पठाण (२६, रा.कुंजखेडा) जखमी झाला. त्याला कन्नडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. बस पोलिस ठाण्यात उभी करण्यात आली आहे.