आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या उपयोगाच्या 4 बातम्या: कचनेरसाठी 50 बस, भुसावळसाठी दर 45 मिनिटांनी बससेवा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विविध ठिकाणच्या यात्रा, त्यामुळे होणारी प्रवाशांची गर्दी आणि मागणी लक्षात घेऊन रेल्वे एसटी महामंडळाने कचनेर कोलम यात्रेसाठी विशेष रेल्वे बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. बीसीएम यंत्राचे काम सुरू असल्याने अमरावती- पुणे एक्सप्रेस तब्बल १२५ दिवस उशिराने धावणार आहे. तुमच्या दैनंदिन उपयोगाच्या या चार बातम्या एकत्रितपणे....
 
अमरावती-पुणे एक्स्प्रेस १२५ दिवस उशिराने
मध्य रेल्वेमध्ये बीसीएम मशीनचे काम चालू करण्यात आले आहे. हे काम १२५ दिवस चालणार आहे. कुर्डूवाडी रेल्वेस्थानकावर सकाळी ०९.४५ ते १०.४५ वाजेपर्यंत हा ब्लॉक चालू राहील. याचा परिणाम म्हणून नोव्हेंबर २०१७ पासून १२५ दिवस अमरावती ते पुणे एक्स्प्रेसमार्गे अकोला, पूर्णा ही या कालावधीत एक तास उशिरा धावेल.
 
भुसावळ मार्गावर बस
प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन एसटी प्रशासनाने औरंगाबाद, जळगाव, भुसावळकरिता मध्यवर्ती बसस्थानकातून दर ४५ मिनिटांना बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबरपासून ही सेवा सुरू झाली आहे. जळगावसाठी पहाटे ५.१५ ते रात्री १०.३०, तर भुसावळकरिता पहाटे ४.४५ ते रात्री १० वाजेच्या दरम्यान या बस धावणार आहेत. नवीन सेवेमुळे भुसावळ, जळगाव, औरंगाबाद मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
 
कचनेर यात्रा
कचनेर यात्रेस सुरुवात झाली आहे. शुक्रवारी मध्यवर्ती स्थानकातून तर सिडको बस स्थानकातून मागणीनुसार बस सोडल्या जाणार आहेत. शनिवारी मुख्य यात्रा असल्याने जिल्ह्यातील आठ आगारातून एकूण ५० बस सोडण्याचे एसटी प्रशासनाने नियोजन केले आहे. त्यापैकी सिडको बस स्थानकातून सर्वाधिक ३० तर मध्यवर्ती स्थानकातून १० इतर आगारातून १० अशा एकूण ५० बस धावणार आहेत.

कोलम यात्रा
कोल्लम येथे शबरीमला उत्सवासाठी मराठवाड्यातून मोठ्या संख्येने भाविक, पर्यटक दर्शन यात्रेसाठी जातात. त्यांची संख्या लक्षात घेऊन नांदेड रेल्वे विभागाने यंदा चार विशेष रेल्वेच्या आठ जादा फेऱ्या सुरु करणार आहे. औरंगाबाद ते कोल्लम आणि १२ डिसेंबर, अकोला ते कोल्लम १४ डिसेंबर, आदिलाबाद ते कोल्लम २८ डिसेंबर, तिरुपती ते अकोला १८ डिसेंबर, तिरुपती औरंगाबाद ११ २५ डिसेंबर, तिरुपती आदिलाबाद जानेवारी विशेष रेल्वे धावणार आहे. या गाड्यास प्रत्येकी १८ डबे असतील.
 
बातम्या आणखी आहेत...