आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

80 हातगाडीवाल्यांनी बुडवला जीएसटीसह सर्व कर भरणाऱ्या 200 दुकानदारांचा धंदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ऐनदिवाळीत हातगाडीवाल्यांनी टिळक पथावरील दुकानदारांचा व्यवसाय पळवल्याने व्यापारी त्रस्त आहेत. पैठण गेट ते गुलमंडी पार्किंगपर्यंतचा संपूर्ण रस्ता हातगाड्यांनी व्यापल्याने ग्राहकांना येथे वाहने आणता येत नाहीत. कसेबसे ग्राहक आले तर हातगाड्यांमुळे त्यांना दुकानात जाताच येत नाही. टिळक पथ फेरीवालामुक्त करण्याच्या जबाबदारीवरून पोलिस मनपा एकमेकांकडे बोट दाखवत चालढकल करत असल्याचा आरोप व्यावसायिकांनी केलाय. 
 
दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहक टिळक पथावर येतात. पूर्वी सिटी चौक शहागंजमध्य चांगली बाजारपेठ होती. तेथे हातगाडीवाल्यांनी कब्जा केल्याने ग्राहकांचा ओढा कमी झाला. गेल्या १० वर्षांत टिळक पथाचीही अशीच स्थिती झाल्याने दुकानदार हातगाडीवाल्यांत कायम संघर्ष निर्माण होतो. मंगळवारी अशाच संघर्षात व्यावसायिकांनी तब्बल तास लाइट बंद ठेवून निषेध नोंदवला. या विरोधानंतर बुधवारी पोलिसांनी हातगाडीवाल्यांना पैठण गेटबाहेर रोखले. यामुळे टिळक पथ माेकळा झाला, मात्र आत येण्यास रस्ताच नसल्याने दिवसभर येथे तुरळक ग्राहकच आले. 
 
ठेकेदारांंच्या ८० हून अधिक हातगाड्या 
व्यापाऱ्यांनी१८ सप्टेंबरला पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना भेटले होते. यादव यांनी हा मनपाच्या अखत्यारीतील विषय असल्याचे सांगत हात झटकले होते. पोलिसांनी किमान पी १, पी पार्किंगचे नियम शिथिल करावे, अशी व्यापाऱ्यांची मागणी होती. ती आयुक्तांनी मान्य केली. पण प्रत्यक्ष कारवाई नाही केली. मनपा मात्र हा पोलिसांचा विषय सांगून हात वर करत आहे. 
 
टिळक पथावरील व्यावसायिक १०० टक्के वीज बिल भरतात. प्रत्येकाकडे जीएसटीची नोंदणी आहे. आयकर, मालमत्ताकर, पाणीपट्टीही भरतात. यातून सरकारला महसूल मिळतो. मात्र, फेरीवाले एक छदामही कर भरत नाहीत. तरीही ते कमाई करतात.अनेक व्यावसायिकांचा दिवसाकाठी ते हजार रुपये खर्च आहे. मात्र, ८० हून अधिक फेरीवाल्यांनी २०० दुकानदारांचा व्यवसाय बुडवला आहे. 
 
टिळक पथावर ठेकेदारांच्या ८० हून अधिक हातगाड्या आहेत. ते नगाप्रमाणे माल मोजून देतात. नगामागे ५० ते १०० रुपये कमिशन विक्रेत्याला मिळते. यामुळे जास्तीत जास्त माल विकण्याचा त्यांचा घाट असतो. हे सर्व हातगाडीवाले बिहार, उत्तर प्रदेशातून आले आहेत. त्यांंच्याविरोधात १७५ दुकानदारांनी एकजूट केली. ते सातत्याने यास विरोध करत आहेत, असे मकाती म्हणाले. 
 
कपडा व्यावसायिकांचा वर्षभरातील ७० टक्के व्यवसाय दिवाळीत होतो. सणासुदीत पैठण गेट ते गुलमंडी चौकात बॅरिकेड्स टाकून चारचाकी वाहनांना प्रवेश बंद केला जातो. फक्त दुचाकी आत येतात. ग्राहक दुकानांसमोर दुचाकी लावून कपडे खरेदीसाठी जातात. मात्र, हा रस्ता हातगाड्यांनी व्यापल्यामुळे येथे ग्राहक फिरकेनासा झालाय. पायी येणाऱ्यांना दुकानात जाण्यासाठी वाट नसल्याने ते इतरत्र निघून जातात. फेरीवाल्यांमुळे एकीकडे दुकानदार त्रस्त आहेत तर ग्राहकांनाही येणे गैरसोयीचे झाल्याचे व्यावसायिक युसूफ मकाती यांनी दिली. 
 
कायमस्वरूपी तोडगा काढा 
हा रस्तानो हॉकर्स झोन असून येथे एकही हातगाडी येणार नाही यासाठी मनपा, पोलिसांनी कायमस्वरूपी तोडगा काढावा. यातून संघर्ष टळून सणावाराची खरेदी आनंदात होईल. 
- युसूफ मुकाती, व्यावसायिक 
 
करदात्यांंचे नुकसान 
आम्ही कर भरतो. मात्र, हातगाडीवाले एक रुपयाही अदा करता येथे व्यवसाय करतात. ते सरकारचा महसूल बुडवतात. त्यांच्यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा. 
- किशोर काल्डा, व्यावसायिक 
बातम्या आणखी आहेत...