आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बिझनेस लीडर्स’ना शनिवारी ऐका

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - लघु व मध्यम उद्योगांना तोंड द्यावे लागत असलेल्या वेगवेगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी मराठवाड्यातील पहिल्याच सीईओ परिषदेचे शनिवारी आयोजन करण्यात आले आहे.
‘सीएमआयए’ व ‘कॉन्स्ट्रो प्रोजेक्ट’तर्फे हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे सकाळी सव्वानऊला होणा-या परिषदेत देश-विदेशातील उद्योग क्षेत्रातील नामांकित बिझनेस लीडर्सना ऐकण्याची संधी मिळणार आहे. या परिषदेत ‘एल अँड टी’ अध्यक्ष यशवंत देवस्थळी ‘बजाज ऑटो’चे सीओओ प्रदीप श्रीवास्तव, ‘एनएचके’चे (जपान) व्यवस्थापकीय संचालक हितोशी हाशिमोटो, सीएट टायर्सचे सीएफओ सुनील सप्रे व ‘टाटा सर्व्हिसेस’चे माजी व्यवस्थापकीय संचालक टी. आर. डुंगाजी हे मार्गदर्शन करणार आहेत. मराठवाड्यातील उद्योजकांना व मध्यम उद्योगातील उच्च अधिका-यांना व्यवसायाच्या संधी कशा शोधाव्यात, पैसा व मनुष्यबळ याची कशी हाताळणी करावी आदींवर परिषदेत मार्गदर्शन केले जाणार आहे.