आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्योजकाची मोमबत्ता तलावात आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दौलताबाद येथील ऐतिहासिक मोमबत्ता तलावात उडी घेऊन औरंगाबादेतील उद्योजकाने सोमवारी आत्महत्या केली. नितीन ओमप्रकाश अग्रवाल (रा. ३६, रा. वेदांतनगर) असे त्यांचे नाव आहे. उद्योगातील अपयशामुळे ते नैराश्यग्रस्त होते. त्यातूनच त्यांनी जीवन संपवले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. कालच तयांनी वाढदिवस साजरा केला होता.
२१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास तलावात एक मृतदेह तरंगत असल्याचे स्थानिक नागरिकांना दिसले. त्यांनी ही माहिती दौलताबाद पोलिस ठाण्याला कळवले. मग पोलीस उपनिरीक्षक दिनेश सूर्यवंशी, एच. व्ही. ढाकणे, पी. सी. दहिफळे घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांच्या मदतीने त्यांनी मृतदेह बाहेर काढून तपासणी केली. तेव्हा तो नितीन यांचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या चारचाकीचे स्मार्ट कार्ड, एटीएम, मोबाईल आढळला. तलावाजवळ उभ्या असलेल्या होडा सिटीची (एमएच२०बीवाय ३३१३) चावी होती. पोलिसांनी मृतदेह घाटी रुग्णालयात पोस्टमार्टेमसाठी पाठवला. त्याचा अहवाल आल्यावर तपासाची पुढील दिशा स्पष्ट होईल. मात्र, प्रथमदर्शनी ही आत्महत्याच असल्याचा पोलिसांचा कयास असून त्यांनी तशी नोंद पोलिस ठाण्यात केली आहे.

काल होता वाढदिवस
अग्रवाल सात भागीदारांसोबत गेल्या काही वर्षांपासून अॅल्युमिनिअम निर्मितीच्या व्यवसायात होते. पैठण रोडवर त्यांचा कारखाना आहे. मात्र, फारसा फायदा होत नसल्याने ते नैराश्यग्रस्त होते. मात्र, यामुळे ते जीवनाची अखेर करतील, असे कधीच वाटले नाही, असे त्यांच्या मित्रपरिवाराचे म्हणणे आहे. अग्रवाल यांच्यावर कोणताही मानसिक दबाब नव्हता. त्यांनी कालच कुटुंबियासोबत वाढदिवस साजरा केला, असे त्यांचे मेहुणे नितीन बगडिया यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...