आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादच्या उद्योजकाची अहमदनगर येथे आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरातील उद्योजक श्रीधर आर. कुलकर्णी (६५, रा. वाळूज) यांनी सोमवारी सायंकाळी नगर येथे आत्महत्या केली. आत्महत्येचे नेेमके कारण समजू शकले नाही.
कुलकर्णी यांची वाळूज येथे शार्प डायमंड टूल नावाची कंपनी आहे. कंपनीची एक शाखा त्यांनी नगर येथेही सुरू केली होती. श्रीरामपूरमध्येदेखील त्यांचे श्रीराम अॅग्रो नावाचे युनिट होते. त्यामुळे काही काळ ते नगरला वास्तव्यास असत. सोमवारी दुपारपासून त्यांचा मुलगा त्यांना फोन करत होता. मात्र ते उचलत नव्हते. अखेर त्यांच्या मुलाने नगर येथील कंपनीचा व्यवस्थापक सतीश मायी यांना घरी पाठवले, तेव्हा कुलकर्णी यांनी गळफास घेतल्याचे समोर आले. त्यांनी ही माहिती तत्काळ तोफखाना पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवगृहात ठेवला होता. सोमवारी सकाळी तो त्यांच्या नातेवाइकांनी ताब्यात घेतला.
आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. मात्र त्यातील मजकूर कळू शकला नाही. स्वप्निल इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी टेक्निकल डायरेक्टर म्हणून काम पाहिले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, मुलगी आणि तीन भावंडे आहेत.