आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परागकणांचे दूत : फुलपाखरांच्या 10 जाती नष्ट होण्याच्या मार्गावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कीटक -तणनाशके, रासायनिक खते आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या तडाख्याने फुलपाखरांचे जीवन पोळून निघत आहे. परागकण प्रक्रियेचे माध्यम बनून वनस्पतींच्या कित्येक जातींच्या वृद्धीस कारणीभूत ठरणार्‍या रंगीबेरंगी फुलपाखरांच्या दहा प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. शहरासह जिल्ह्यातील 65 टक्के फुलपाखरे घटली आहेत. मान्सूनने दवंडी देताच कोषाबाहरे पडणारी फुलपाखरे हिवाळ्यात मुक्त विहार करू लागतात. त्यांच्या भिन्न आणि आकर्षक रंगांमुळे निसर्ग सौंदर्यातही भर पडते. मात्र, या निरागस जिवांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने फुलपाखरांचे अभ्यासक आणि निसर्गप्रेमींच्या आनंदावर विरजण पडत असून परागकण प्रक्रियेतही अडथळा निर्माण झाला आहे.

जन्म 250 दशलक्ष वर्षांपूर्वी
पृथ्वीवर फुलपाखरांचा जन्म 250 दशलक्ष वर्षांपूर्वी झाला आहे, तर मानव 80 दशलक्ष वर्षांपूर्वी जन्माला आला. 170 दशलक्ष वर्षांआधी फुलपाखरे पृथ्वीवर अवतरली. काही फुलपाखरांची संख्या कमी होत असली, तरी पुन्हा नवीन जातींचे कीटक तयार होतात.