आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सीए’परीक्षेत औरंगाबादचा गौतम गुप्ता 27 वा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - दि. इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंटच्या वतीने नोव्हेंबर 2011 मध्ये घेण्यात आलेल्या सीए अंतिम आणि सीपीटी परीक्षेत औरंगाबादचा गौतम गुप्ता देशात 27, तर सुमीत भारुका 43 वा आला.
या परीक्षांचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल 35 टक्के लागला आहे. औरंगाबाद येथून सीए अंतिम परीक्षेसाठी 200 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 21 जण पास झाले. पहिल्या प्रयत्नात 26, तर दुस-या प्रयत्नात 42 जण पास झाले. सीपीटीसाठी 500 जण बसले होते. त्यापैकी 125 जण उत्तीर्ण झाले. यात 78 मुले आणि 47 मुलींचा समावेश आहे, अशी माहिती दि इंडियन इन्स्टिट्यूटचे राहुल लोहाडे यांनी दिली.
सीए-सीपीटी परीक्षेसाठी एकूण 567 जण बसले होते. त्यापैकी एकूण 481 जण उत्तीर्ण झाले आहेत, असे व्हाइस चेअरमन निखिल ग्रामले यांनी सांगितले. वैभव मालपाणी, समाधान जाधव आणि पैठण येथील लोकेश बबनलाल गोधा हेही सीएच्या अंतिम परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
मेहनतीचे फळ मिळाले - नियमित इन्स्टिट्यूटमध्ये शिकवलेले आणि अभ्यास यामुळे हे यश मिळाले, अशी प्रतिक्रिया देशात 43 वा आलेला सुमीत भारुका याने दिव्य मराठीशी बोलताना दिली. आपण यशस्वी होेऊ हा विश्वास होता. देशातून 43 वे येऊ, असे वाटले नव्हते. आज सर्व मेहनतीला यश मिळाले. यासारखा दुसरा आनंद नाही. सुमीत हा ग्रामीण भागातील विद्यार्थी असून त्याने त्याचे दहावी, बारावी कन्नडमधून पूर्ण केले. सध्या तो पुण्यात इंडियन लॉ स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. सुमीतचे वडील सुभाष भारुका यांचा पेट्रोलपंप आहे, तर भाऊ संदेश भारुकादेखील सीए आहे.