आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंत्रिमंडळाच्या बैठकीवर धडकणार १५ मोर्चे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - तब्बल आठ वर्षांनंतर मंगळवारी शहरात मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. यानिमित्त आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी विविध पक्ष संघटनांचे १५ मोर्चे या बैठकीवर धडकणार आहेत. शिवाय सुमारे ५५ निवेदनांची मंत्र्यांवर बरसात होणार आहे. सर्व मोर्चे, निदर्शनांसाठी आमखास मैदानाची जागा निश्चित करण्यात आली असल्याची माहिती विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक गोवर्धन कुळेकर यांनी दिली.
मंगळवारी होणाऱ्या बैठकीसाठी ऑक्टोबर रोजी मंत्री, वरिष्ठ अधिकारी शहरात दाखल होत आहेत. रविवारपर्यंत पोलिस प्रशासनाकडे १५ मोर्चे तर ५५ निवेदनांसाठी अर्ज दाखल झाले होते. निदर्शने, धरणे, उपोषण आदींमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन बैठकीदरम्यान अनुचित प्रकार घडण्याची शक्यता व्यक्त असल्यामुळे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी ऑक्टोबरला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय सुभेदारी विश्रामगृहाच्या २०० मीटर परिसरात सभा, बैठका, मोर्चा, निदर्शने उपोषणास प्रतिबंध करत जमावबंदीचा आदेश काढला आहे. एकाच वेळी एकाच मार्गावरून मोर्चे निघू नयेत यासाठी त्यांना मार्गही ठरवून देण्यात आले असल्याचे पोलिस निरीक्षक गोवर्धन कोळेकर यांनी सांगितले.

हॉटेल्सलाही सुरक्षा : उच्चपदस्थअधिकारी तसेच मंत्र्यांसोबत त्यांचे सहायक, आमदार खासदार सोमवारीच शहरात दाखल होत आहेत. यामुळे सुभेदारी विश्रामगृहासोबत हॉटेलवर त्यांचा मुक्काम असेल. व्हीआयपी थांबलेल्या हॉटेल्सना सुरक्षा दिली जाईल.

मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्री उच्चपदस्थ अधिकारी येत असल्याने विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात विशेष कमांडोंची नियुक्ती करण्यात आली आहे. बाहेरगावच्या सहा पोलिस उपायुक्तांसह दीड हजार कर्मचारी, एसआरपीच्या तुकड्याही येणार असल्याची माहिती आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.

मिल कॉर्नर, चेलीपुरा भडकल गेट क्रांती चौकातून मोर्चे निघणार आहेत. सकाळी ११ वाजता या मोर्चांना सुरुवात होऊन ते आमखास मैदानावर धडकतील. या मोर्चांच्या मार्गावर तसेच अंतिम ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले असून २५ पोलिस कर्मचाऱ्यांची विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत.
बातम्या आणखी आहेत...