आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळी पाहणी पथक उद्यापासून मराठवाड्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - केंद्रातील वरिष्ठ सनदी अधिकारी परवेझ शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली १० अधिकाऱ्यांचे पथक रविवारी दुपारपासून मराठवाड्यात दाखल होत आहे. त्यांच्या सोबतीला राज्याचे मुख्य सचिव तसेच विभागीय आयुक्त असतील. अधिकाऱ्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर काहीजण औरंगाबाद, जालना तर काही जण उर्वरित जिल्ह्यांचा दौरा करून पुढे विदर्भात रवाना होतील.
तेथील परिस्थितीची पाहणी केल्यानंतर नागपुरात या अधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. परवेझ शर्मा अध्यक्ष असलेल्या या पथकात डॉ. सी. एम. रायपुरे, व्यंकट नारायण्णा अजन्ना, जयकुमार पाथला, श्रीकालसिंग, आर. पी. सिंग, गुलझारीलाल, चंद्रशेखर साहुका यांचा समावेश आहे. अधिकाऱ्यांकडून कागदांवरील माहिती घेण्याबरोबरच हे पथक प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करणार आहे. त्यानंतर ते केंद्राकडे अहवाल देतील. त्यांच्या अहवालानंतर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना किती मदत द्यायची याचा निर्णय घेतला जाईल.