आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीत केबल जळाली, शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत, जलवाहिनी शुक्रवारी रात्री दहापासून बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जायकवाडी(जुनी योजना) पंपगृहातील मुख्य पॅनलमध्ये शुक्रवारी रात्री स्पार्किंग होऊन वीजपुरवठा करणारी केबल, पॅनल बोर्ड जळून खाक झाले. त्यामुळे ७०० मिमी व्यासाच्या वाहिनीला होणारा पाणी उपसा बंद पडला. शनिवारी रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते. परिणामी जुन्या शहरासह निम्म्या शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 


छावणीतील व्हॉल्व्ह दुरुस्त करण्यासाठी मनपाने १४ नोव्हेंबरला १४०० मिमी व्यासाची जलवाहिनी सहा तासांसाठी बंद ठेवली. त्यामुळे दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. तो पूर्ववत होत असतानाच शुक्रवारी जायकवाडीत झालेल्या स्पार्किंगमुळे शनिवारी जुन्या शहरासह काही भागात पाणी आले नाही. रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम सुरू असल्याने नेमके कोणत्या भागाला पाणी येईल, याबाबत सर्वच जण संभ्रमात आहेत. तसेच पुढील तीन-चार दिवस पाणीपुरवठा विस्कळीत राहील, असे अधिकारी म्हणाले. 


येथे परिणाम
भुजबळनगर,पडेगाव, कोतवालपुरा, खडकेश्वर, सम्राट कॉलनी, भोईवाडा, हनुमान टेकडी जलकुंभ परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत होईल. तसेच पैठण गेट, सिल्लेखाना, जुना उस्मानपुरा, रमानगर, नूतन कॉलनी, गुलमंडी, औरंगपुरा, मछली खडक, गाडगेनगर, नागसेननगर, कबीरनगर, शहागंज, दिल्ली गेट जिन्सी जलकुंभावरून ज्या भागांना पाणी देण्यात येते, त्या भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. काही ठिकाणी कमी दाबाने पाणी येत आहे. 

बातम्या आणखी आहेत...