आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोहीम: करचोरी रोखण्यासाठी आता केबलचे होणार सर्वेक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- केबल कनेक्शनची संख्या कमी दाखवून कोट्यवधींच्या करमणूक कराची होणारी चोरी रोखण्यासाठी करमणूक विभागाच्या वतीने सर्वेक्षणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. करचोरी रोखणे आणि उत्पन्न वाढवण्यासाठी औरंगाबादसह मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील केबल ऑपरेटरच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. दर महिन्याला तीन केबल ऑपरेटरच्या कनेक्शनची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. जास्त केबल कनेक्शन आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. एकट्या औरंगाबाद शहरातून करमणूक विभागास वर्षाकाठी २० कोटींचे उत्पन्न मिळते.
मराठवाड्यात करमणूक कर विभागांतर्गत केबलच्या माध्यमातून २०१४-१५ अंतर्गत ४५ कोटी २३ लाख रुपयांचा कर जमा झालेला आहे. राज्यातील केबल सर्वेक्षण करण्याचे आदेश २६ मार्च २०१५ रोजी देण्यात आले आहेत. हा सर्व्हे करताना शहरी आणि ग्रामीण केबल ऑपरेटर यांच्यामध्ये ड्रा पद्धतीने तीन ऑपरेटरची निवड केली जाणार आहे. मे महिन्यापासून
या सर्व्हेला सुरुवात झाली आहे.
काय आहे वास्तव
केबल ऑपरेटर त्यांच्याकडे असणारे ग्राहक कमी दाखवतात. विशेषत: प्रत्येक ठिकाणी केबल ऑपरेटर हे राजकीय पुढाऱ्यांचेच असतात. त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. झालीच तर ती कागदोपत्री असते. त्यामुळे या नव्या धोरणामुळे खऱ्या अर्थाने कारवाई होणार का याबाबत उत्सुकता आहे. एकट्या औरंगाबाद शहरात ९६,६५५ केबल ग्राहक आहेत.
ऑपरेटरकडे १.५ कोटीची थकबाकी
मराठवाड्यातीलऑपरेटरकडे एक कोटी ३६ लाख रुपये इतकी थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्याची कार्यवाही सुरू आहे. यावर्षी करमणूक करापोटी ४५ कोटी २३ लाख रुपयांची वसुली करण्यात आलेली आहे. यामध्ये एकट्या औरंगाबादची थकबाकी ५२ लाख इतकी आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, जुन्या निकषामुळे उत्पन्न कमी...मराठवाड्यात दोन लाख ४४ हजार केबल ग्राहक...
बातम्या आणखी आहेत...