आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातारा, देवळाईत गप्पी मासे सोडण्याची मोहीम, येथे आहे गप्पी मासे पैदास केंद्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथरोग नियंत्रण आणि डास अळ्यांचा नायनाट करण्यासाठी सातारा, देवळाई भागात गप्पी मासे सोडण्याची मोहीम राबवली जात आहे. अतिजोखमीच्या भागात औषध धूर फवारणीही केली जात आहे. सातारा, देवळाई भागात मलेरिया विभागाने गप्पी मासे पैदास केंद्र सुरू केले आहे. यातील मासे सार्वजनिक विहिरी, मोठे हौद आदी ठिकाणी सोडले जात आहेत.

देवळाई गावात १५ दिवसांपूर्वीच मोहीम राबवली असून सातारा गावात दोन दिवसांपासून मोहीम सुरू आहे. सातारा मोठे हौद, पाणीपुरवठ्याची विहीर तसेच रेणुकामाता मंदिर परिसरातील विहिर, खड्ड्यांत गप्पी मासे सोडण्यात आले. एस. पी. सोळुंके, सी. एम. उदणे, अन्वर शेख, कैलास गायकवाड उपस्थित होते.
 
येथे आहे गप्पी मासे पैदास केंद्र : सातारागावातील खंडोबा मंदिरासमोरील जुनी विहीर, रेणुकामाता मंदिराजवळील राणी विहीर आणि मोठ्या हौदातही गप्पी मासे पैदास केंद्र तयार करण्यात आले आहे.
 
हे भाग अतिजोखमीचे
सातारा,देवळाई, छत्रपतीनगर, एकता कॉलनी, सह्याद्री कॉलनी, चौधरी इस्टेट यासह बीड बायपास परिसराचा अतिजोखमीच्या भागात समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...