आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंपन्यांच्या भरती मेळाव्यात 284 उमेदवारांची झाली निवड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मंदीच्या सावटाखाली अनेक कंपन्या कर्मचारी कपातीचे धोरण अवलंबत असताना बारावी उत्तीर्ण होऊन किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या (एमसीव्हीसी) विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी उपलब्ध केली जात आहे. सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयामध्ये रविवारी आयोजित मेळाव्यात नामांकित 30 कंपन्यांनी 284 बेरोजगारांची शिकाऊ उमेदवार म्हणून निवड केली आहे. मेळाव्यात 900 जणांनी सहभाग घेतला होता.

जिल्हा व्यवसाय शिक्षण मंडळ, सीएमआए, मसिआ, एमसीटीसी आणि स.भु. विज्ञान महाविद्यालयाच्या सहाकार्याने हा मेळावा घेण्यात आला. यासाठी जालना, परभणी तसेच गंगापूर, सोयगाव, पैठण, वाळूजमधील तरुणांनी मोठय़ा संख्येने उपस्थिती लावली. निवड झालेल्या उमेदवारांना तीन ते सात हजारांपर्यंत मानधन देण्यात येणार आहे. मेळाव्याच्या यशस्वितेसाठी ए. के. दरबस्तवार, उमा दसरी, एन.के. सर्जे, एस.जी. गोसावी, डी.के. खैरे, आर.टी. नागे, पी.यू. पुडलकर, एस.के. कानडे, ए.ए. सय्यद, एस.डी. जैस्वाल, ई.के. कारले, बी.जी. राजपूत आदींनी सहकार्य केले. सहभागी उमेदवारांची जाण्या-येण्यासह, भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.

या ट्रेडसाठी झाल्या मुलाखती : ऑटो इंजिनिअरिंग असोसिएशन, इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी (फिटर, वेल्डर, टर्नर, मेकॅनिस्ट), बिल्डिंग मेंटेनन्स अँड कन्स्ट्रक्शन, कॉम्प्युटर सायन्स, मार्केट सेल्समन, पर्चेसिंग अँड स्टोअरकीपिंग, टुरिझम, इन्शुरन्स बँकिंग, हॉर्टिकल्चर, क्रॉप सायन्स, मेडिकल लॅब टेक्निशियन, बेकरी अँड कन्फेक्शनरी, अकाउंटिंग अँड ऑडिटिंग, ऑफिस मॅनेजमेंट आदी.

या कंपन्यांचा होता सहभाग
मेळाव्यात विप्रो, सीमेन्स, एनआरबी, गरवारे पॉलिस्टर, हॉटेल अजंता अँम्बेसेडर, वोक्हार्ट, टेक्सेस लाइफस्टाइल, साकला, शासकीय मुद्रणालय, स्वराज, तिरुपती नेत्रालय, अँडप्लस टेक्नॉलॉजी, जनसेवा पॅथॉलॉजी, कस्तुरी पॅथॉलॉजी, एमजीएम, एस.व्ही. इंजिनिअरिंग, पूजा इंजिनिअरिंग, आयजीटीआर, स्टरलाइट, एंड्रेस हाऊजर, अक्षा ऑप्टिकल, शुक्ला इंडस्ट्री, ग्रीन गोल्ड आदी कंपन्यांनी सहभाग घेतला होता.