आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहान मुलांनी केला परिसर स्वच्छ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एमराल्ड सिटीमध्ये लहान मुलांनी हातात झाडू, खराटे घेऊन स्वच्छता केली. परिसरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने स्वच्छता अभियानात घेतलेल्या पुढाकारात चिमुकल्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. या वेळी शालिमार, कोहिनूर अपार्टमेंट परिसरात वाढलेले गाजर गवत काढून स्वच्छता करण्यात आली.

गारखेडा परिसरातील एमराल्ड सिटीमध्ये फोफावलेले गाजर गवत, रस्त्यावर साचत असलेला कचरा व त्यातून येणारी दुर्गंधी यामुळे कीटक, मच्छर व जिवाणूंचा प्रादुर्भाव वाढून नागरिकांना आरोग्याच्या समस्यांचाही सामना करावा लागत आहे. स्वच्छ भारत अभियानाचे औचित्य साधून नागरिकांनी सकाळी ८ वाजेला स्वच्छता मोहीम हाती घेतली. महिला, पुरुषांच्या पुढाकाराने घेतलेल्या या उपक्रमात मुलांनीही हातात झाडू, खराटे, फावडे घेऊन घाण साफ केली. या वेळी भानुदास भारसाखळे, एस.के. पाटील, विठ्ठल महाजन, अरविंद वानखेडे, वैशाली मुकंद, डॉ. संजय पाटील, अजय करवा, उल्हास बाबरे, श्रीलेखा पाटील, प्रा. अंजली सुरळीकर, जैनिका महाजन, श्रीनिवास गुंडाळे, शोभा बल्लाळ, वैष्णवी जोशी, जैनिशा महाजन, कीर्ती गणोरे, सरिता कुलकर्णी, मीना शेळके, व्ही. एल. चव्हाण, स्वाती काळे, आत्माराम घनमोडे आदींचा समावेश होता.