आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅनडाच्या शिक्षिकेने दिले जि. प. शाळेत धडे, साताऱ्याच्या 8 शाळेत दिवसांची विनामूल्य कार्यशाळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्हा परिषदेच्या साताऱ्यातील शाळेत मुले आणि शिक्षकांनी सहा ते १६ जानेवारी या कालावधीत शिकण्याचा आगळावेगळा अनुभव घेतला. त्यांना शिकवण्यासाठी दिशा इंटरनॅशनल फाउंडेशन ट्रस्टच्या उपक्रमात खास कॅनडाहून सुझान वेस्टफल आल्या होत्या. शिक्षक आणि मुलांना त्यांनी स्वयंशिस्त, संवादकौशल्य आणि इंग्रजीचे धडे दिले.
परदेशी मॅडमला शाळेत पाहून सुरुवातीला मुले चकित झाली. काहीशी गांगरली. पण हळूहळू त्यांची गट्टी जमली. शाळेने केलेल्या स्वागतामुळे मग सुझानही भारावल्या आणि लवकरच पुन्हा महिनाभरासाठी येण्याचे आश्वासन देत मायदेशी परतल्या.

५९ वर्षांच्या सुझान वेस्टफल या कॅनडातील आेटावा प्रांताच्या. तीन दशके शिक्षक म्हणून कार्य केल्यानंतर त्या नुकत्याच निवृत्त झाल्या. निवृत्तीनंतरही त्यांचे ज्ञानदानाचे कार्य सुरू आहे. लहानपणापासून त्यांना भारताचे आकर्षण वाटत होते. इथली शाळा, शिक्षक, विद्यार्थी कसे असतील याबाबत कमालीचे कुतूहल वाटायचे. भारतातील शाळेत अध्यापनाची त्यांची इच्छा होती. याच वेळी दिशा फाउंडेशनचे किरॉन वैष्णव औरंगाबादेत टीचर्स ट्रेनिंग कोर्स राबवण्यासाठी परदेशी तज्ज्ञ शोधत होते. त्यांना सुझान भेटल्या आणि औरंगाबादेत येण्यासाठी तयार झाल्या. त्यांनी सातारा येथील देशातील पहिल्या जिल्हा परिषदेच्या आयएसओ ९००१-२००८ मानांकित केंद्रीय प्राथमिक शाळेत आठवडाभर वर्ग घेतले. शाळा सुटल्यावर दोन तास हे वर्ग चालायचे. एकाही शिक्षकाने तक्रार करता यात हजेरी लावली. खेळ, पावर पाॅइंट प्रेझेंटेशन आणि प्रात्यक्षिकांद्वारे त्यांनी गुरुजींचे वर्ग घेतले.

पंजाबी ड्रेसचा पोशाख : शिक्षिकांचा पोशाख जाणून घेतल्यावर सुझान यांनीही साडी परिधान करण्याची तयारी केली. पण ती सावरत वर्ग घेणे त्यांना अवघड वाटल्याने पंजाबी ड्रेस शिवून घेतला. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांनी जोराच्या आवाजात ‘गुड मॉर्निंग, नमस्कार..’ असे म्हणत स्वागत केले. मात्र, अशा स्वागतामुळे छातीत धडकी भरल्याचे त्यांनी सांगितले. सात दिवसांत त्यांनी नमस्कार, धन्यवाद, खूप छान हे मराठी शब्द शिकून घेतले. जाताना किरॉन यांनी त्यांना खास मराठमोळी साडी भेट दिली. विद्यार्थी शिस्तबद्ध, तर शिक्षक हुशार आहेत. लवकरच महिनाभरासाठी येणार असल्याचे त्या म्हणाल्या. शाळेच्या वैविध्यपूर्ण उपक्रमाचा एक भाग म्हणून ही कार्यशाळा होती. यापुढेही परदेशी शिक्षकांना आमंत्रित केले जाणार असल्याचे मुख्याध्यापिका मंजुश्री राजगुरू यांनी सांगितले. ज्ञानदा भरणे यांनी दुभाषक म्हणून काम केले

इंग्रजीसाठी प्रशिक्षण घेणार
आपल्याकडील शिक्षकज्ञानी असले तरी त्यांचे इंग्रजी कच्चे असल्याचे सुझान यांना जाणवले. त्यामुळे आम्ही सातत्याने परदेशी तज्ज्ञांमार्फत शाळांमध्ये इंग्रजीच्या कार्यशाळा घेणार आहोत. - किरॉन वैष्णव, अध्यक्ष,दिशा इंटरनॅशनल फाउंडेशन ट्रस्ट

नॅन्सी अॉटवेलची शिक्षण पद्धती
सुझानयांना नॅन्सी २०१५ चा टीचर्स ग्लोबल अवॉर्ड मिळाला आहे. त्यांनी अध्यापनाच्या कल्पक पद्धती मांडणारे एक पुस्तक लिहिले असून आधुनिक शिक्षण क्षेत्रात ते प्रमाण मानले जाते. या पुस्तकातील सूत्रांना स्वत:च्या कल्पकतेची जोड देत स्वत:ची शिक्षण पद्धती त्यांनी तयार केली आहे.