आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cancellation Of Flight, Traveler Waiting On Airport Issue At Aurangabad

पाइस जेटचे विमान रद्द, ८० प्रवासी 7 तास ताटकळले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दुपारीवाजून २० मिनिटांनी दिल्लीकडे झेपावणारे स्पाइस जेटचे विमान ऐनवेळी रद्द झाल्याने ८० प्रवासी 7 तास चिकलठाणा विमानतळावर अडकले. विमानच रद्द झाल्याने प्राधिकरणाने प्रवाशांना विमानतळाच्या आतही प्रवेश दिला नाही. तक्रार कोणाकडे करायची हेही समजत नव्हते. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी विमानतळावर आधी गोंधळ घालत घोषणाबाजी केली. शेवटी तीन बसेसद्वारे हे प्रवासी मुंबईला रवाना झाले. बुधवारी सकाळी वाजून ५५ मिनिटांनी हे प्रवासी दिल्लीला पोहोचतील, असे स्पाइस जेटच्या वतीने सांगण्यात आले.

कंपनीच्या वतीने कॉस्ट कटिंग करण्यात आल्याने हे विमान रद्द झाले असावे, असे कंपनीच्या वतीने खासगीत बोलताना सांगण्यात आले. कंपनीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी प्रवासी तसेच प्रसिद्धिमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला, तर काही प्रवाशांनी बसमधून जाण्यास नकार दिल्याने गोंधळ उडाला. अखेर दुसरे विमान येणारच नाही, असे समोर आल्याने तेही राजी झाले.

नेमके काय घडले? : स्पाइसजेटचे विमान दररोज दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी औरंगाबाद विमानतळावर येते वाजून २० मिनिटांनी दिल्लीला रवाना होते. यासाठी ऑनलाइन बुकिंग केली जाते. मंगळवारी दिल्लीकडे जाण्यासाठी निघालेल्या बहुतांश प्रवाशांनी ते महनिेआधी ऑनलाइन बुकिंग केली होती.

हनिमूनसाठी निघालेली नवदांपत्ये अडकून पडली होती.
हनिमून कपल अडकले : औरंगाबादपरिसरात लग्नानंतर हनिमूनसाठी आले होते. आता पुढील दौरा उद्यापासून सुरू होणार होता; परंतु विमान रद्द झाल्याने त्यांचा हिरमोड झाला. तक्रार स्वीकारण्यासाठी कोणीही राजी नव्हते. पोलिस विमान कंपनीकडे बोट दाखवत होते. स्पाइस जेट कंपनीचे कोणीही अधिकारी येथे नव्हते.
ऐनवेळी बस मागवली
बसक्रमांक एमएच २०-डीडी ०२११ एमएच २०-सीटी ९६६९ या टेम्पो ट्रॅव्हलने ते निघाले होते; परंतु जागा कमी पडल्याने ऐनवेळी आणखी एक बस मागवण्यात आली.

इंधनावरून झाला वाद
स्पाइसजेट आणि विमानतळ प्राधिकरणात गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या थकबाकीवरून वाद सुरू होता. औरंगाबाद ते दिल्ली विमानासाठी सुमारे दीड लाख लिटर पेट्रोल लागते. त्याची थकबाकी दिल्याशिवाय इंधन भरू देणार नाही, असा पवित्रा विमानतळ प्राधिकरणाने घेतल्यामुळे विमान येऊ शकले नाही.