आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅन्सरपीडित पित्याने दिले 5 मुलींना बळ, हलाखीच्या स्थितीत मुलींना दिले उच्च शिक्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मुस्लिम समाजात मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प. त्यातही घरातील परिस्थिती हलाखीची असेल तर शिक्षणाऐवजी त्यांचे लवकर लग्न लावून दिले जाते. मात्र, शहरातील एका खासगी वाहनावर चालक आणि कॅन्सरपीडित नासेर खान यांनी हा समज खोटा ठरवला असून त्यांच्या पाच मुलींना उच्च शिक्षण दिले. त्यातील एक मुलगी इंजिनिअर झाली. दोघींनी बीए बीएडचे शिक्षण घेतले तर दोघी अनुक्रमे बारावी व सहावीत शिक्षण घेत आहेत.

रेल्वेस्टेशनजवळील सादातनगर येथील ५१ वर्षीय खान हे मूळ औरंगाबादचेच. त्यांनी १९७७ मध्ये होलीक्रॉस शाळेतून दहावीपर्यंतचे िशक्षण घेतले. नोकरी न मिळाल्याने वाहन चालवण्याचे प्रशिक्षण घेतले व ड्रायव्हर झाले. लग्नानंतर पाच मुली झाल्या. अगदी मुलांप्रमाणे त्यांनी मुलींना वाढवले. सर्व मुलींना होलिक्रॉस या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण दिले. त्यांच्या सर्वात मोठ्या मुलीचे इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण झाले व सध्या ही मुलगी एका महाविद्यालयात सहायक प्राध्यापक आहे. दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या मुलींचे बीए बीएडचे शिक्षण झाले. चौथ्या नंबरची मुलगी बारावीला असून पाचवी मुलगी सहाव्या वर्गात शिकते.

कॅन्सरवरही केली मात
नासेर खान यांना सन २००५ मध्ये तोंडाचा कॅन्सर झाला. त्यामुळे त्यांना आता व्यवस्थित बोलता येत नाही. यावरही त्यांनी मात केली असून स्वत: खंबीर राहिले आणि मुलींच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. मुलींना मोठ्या पदावर पाहण्याचे ध्येय त्यांनी आजही कायम ठेवले आहे.
संघर्षपूर्ण जगण्यात आहे खरी मजा
आजार, आर्थिक परिस्थितीवर मात करून आजवर संघर्ष केले. यातच जीवन जगण्याची मजा आहे. दोन मुलींना चांगले शिक्षण दिले आणखी दोन मुलींनाही स्वबळावर उभे करण्याची इच्छा आहे. नासेर खान