आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईश्वर अल्ला तेरो नाम मनपा को सन्मती दो भगवान; खास गेटच्या अवशेषांवर मेणबत्या लावून इतिहाप्रेमींचा निषेध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-एैतिहासिक शहरातील एक-एक वास्तू पाडत मनपा प्रशासन शहराची ओळख पुसत आहे.ईश्वर अल्ला  तेरो नाम मनपा को सन्मती दो भगवान अशा घोषणा देत शहरातील दिडशे पेक्षा जास्त इतिहासप्रेमींनी शहागंज ते बायजीपुऱ्यातील खास गेटवर कॅन्डल मार्च काढत मनपा प्रशासनाचा निषेध केला.

सायंकाळी सात वाजता शहागंज येथील गांधी पुतळ्याजवळ शहरातील इतिहाप्रेमी जमले.यात औरंगाबाद हिस्ट्री सोसायटी व इन्टॅक या संस्थांचे प्रतिनिधी,,विद्यार्थी नागरीक यांची मोठी गर्दी होती. स्वातंत्र्य सैनिक ताराबाई लड्डा, इतिहास तज्ञ डॉ.दुलारी कुरेशी, रफत कुरेशी, इतिहास विभागातील प्राध्यापक डॉ.बिना सेनगर,जेष्ठ वास्तू विशारद अजय कुलकर्णी, श्रीकांत उमरीकर यांची उपस्थिती होती. सायंकाळी सात वाजता शहागंज मधील बाजाराच्या प्रचंड गर्दीतून वाटत काढत हा कॅन्डल मार्च निघाला.माईकवरुन प्राध्यापक दुलारी कुरेशी या वाटेतील एैतिहासिक स्थळांची माहिती देत होत्या.

या अनोख्या कॅन्डमार्चची चौकशी करीत शहागंज ते बायजीपुरा भागातील नागरीकही हळू हळू या निषेध मार्चात सहभागी झाले.ही कॅन्डल मार्च खास गेटला पोहोचली तेव्हा त्या दरवाज्याचे पडलेले अवशेष पाहून इतिहास प्रेमी गहीवरले.मनपाने रात्रीतून हे गेट उध्दवस्त करुन काय मर्दुमकी गाजवली,प्रशासनाने न्यायालयाचाही अवमान केला आहे.अशा अशी कॉमेन्ट्री माईकवरुन काही तरुण करीत होते.सर्वजण गेटच्या पाडलेल्या ढिगाऱ्यावर चढले तेथील दगडांवर सर्वांनी आपल्या हातातील मेणबत्या लावल्या आणि शहराचा इतिहास नष्ट करणाऱ्या मनपा प्रशासनाचा निशेष करीत हा कन्डल मार्च विसर्जीत केला.

शहागंजात होते चार महाल..
कॅन्डल मार्च जेव्हा शहागंज येथे आला तेव्हा इतिहास तज्ञ डॉ.दुलारी कुरेशी यांनी सर्वाना या भागातील पुरातन वास्तूंची माहिती दिली.शहागंजातले घड्याळ,मशिद यांचा इतिहास सांगितला. येथेच गगन महल, राजमहल, रंगीन महल, आणि रुप महल असे चार महाल होते.छोटेसे उद्यानही होते. हत्तीखानाही होता. निजाम सरकारचे दिवाण चंदुलाल यांनी सर्व मालमत्ता सांभाळली. या भागातील अनेक वास्तू मलिंकबंर ने बांधलेल्या होत्या असेही त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...