आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरी थांबल्यामुळे "त्या' जुळ्या मुली सुखरूप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दररोजच्या कामातून आलेला शीण घालवण्यासाठी स्वप्निल सुधाकर जाधव आणि सई जाधव बाहेर गेले. परंतु परत येताना त्यांच्यावर काळाने घाव घातला. यात सई यांचा मृत्यू झाला. या दांपत्याला आराध्या आणि सुभिषा या साडेतीन वर्षांच्या जुळ्या मुली आहेत. आजीसोबत घरीच थांबल्यामुळे त्या दोघीही बचावल्या.

स्वप्निल हे सिमेन्स कंपनीत अभियंता आहेत. काही महिन्यापूर्वीच त्यांनी स्वत:चे सिमेंटच्या पाइप आणि ब्लॉकचे युनिट सुरू केले होते. सई यांच्या वडिलांचादेखील नांदेड येथे पाइपचा कारखाना आहे. शहरात त्यांचे ऑफिस आहे, त्या कार्यालयाचे काम सई सांभाळत होत्या. स्वप्निलचे वडील पांटबंधारे खात्यातून कार्यकारी अभियंता म्हणून निवृत्त झाले आहेत तर काका सुधाकर जाधव हे कृषी अधिकारी आहेत. सई यांच्या पार्थिवावर सोमवारी एन-६ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. स्वप्निल यांची प्रकृती स्थिर आहे.

असा झाला अपघात
स्वप्निलजाधव सई हे चिकलठाण्याकडून व्हर्ना गाडीने (एमएच २० सीएस १४४१) घरी परतत होते. त्याच वेळी त्यांची गाडी शहरातून जालन्याकडे जाणारी भरधाव स्कोडा (एमएच २० डीजी ७०) यांच्यात धूत रुग्णालयासमोरील चौकात भीषण अपघात झाला. धडक एवढी जबरदस्त होती की व्हर्नाचा समोरील बाजूचा संपूर्ण चुराडा झाला. यात सई यांचा जागीच मृत्यू झाला. स्वप्निलचे काका दिवाकर जाधव यांनी गाडी चालकाविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. स्कोडा गाडीत कमलेश झवेरी, आशिष राणी, कुणाल बाकलीवाला हाेते, ते जखमी झाले. स्कोडा गाडीचा चालक फरार झाल्याची चर्चा आहे. अपघात झाल्यानंतर सर्व जखमींना धूत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विकास ढोकरे करत आहेत.