आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Car Accident One Dead Three Injured In Khultabad

दोन कारची धडक; एक ठार, तिघे जखमी, वाहनांचा चुराडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद - मारुती कार व इंडिका कार यांच्यात धुळे-महामार्गावर समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातातील मारुती कारमधील चालक ठार झाला आहे. तीन जण जखमी झाले अाहेत. तिघांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक अाहे. जखमींना औरंगाबाद येथे उपचारकरिता हलवण्यात आले आहे.

खुलताबाद शहराच्या बायपासवर तसेच औरंगाबाद-धुळे महामार्गावर ईदगाहजवळील चढावर सोमवारी पहाटे ५ वाजेदरम्यान धुळे मार्गाकडून औरंगाबादकडे जाणारी मारुती कार (एमएच १६ एजे २२१६) त्याचप्रमाणे औरंगाबादकडून धुळे मार्गाकडे जाणारी इंडिका (एमएच २० सीएच ४९७३) या दोन वाहनांची जोरदार धडक समोरासमोर झाली. यात मारुती कारमधील चालक राजेश भंडारी (४३) हा ठार झाला आहे. भंडारीसोबत असलेले ३ जण जखमी झाले आहेत.
तिघांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. तिघांना औरंगाबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले अाहे. इंडिकामधील प्रवासी अपघातानंतर घटनास्थळी दिसून आले. त्यातील जखमींची माहिती मिळू शकली नाही.

अपघातात ठार झालेले राजेश भंडारी हे धुळे येथील रहिवासी आहेत. सध्या ते औरंगाबाद येथे राहत होते. रविवारी आपल्या पत्नी, दोन मुलांसोबत ते धुळे येथून औरंगाबादकडे मारुती कारने येत होते. भंडारी स्वत: कार चालवत होते, तर त्यांचा मुलगा समोरील सीटवर बसलेला होता. पत्नी व मुलगी पाठीमागील सीटवर बसलेले होते.