आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारच्या धडकेने विद्यार्थिनी जखमी; सिल्लोडला तणाव

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड - शहरातील वळण रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास इंडिका व्हिस्टा कारने धडक दिल्याने शाळकरी मुलगी जखमी झाली. अपघात करून कार चालक पसार झाल्याने संतप्त नागरिकांनी एक तास रास्ता रोको आदोलन केले.
शहरातील नॅशनल उर्दू शाळेत इयत्ता तिसरीत शिकणारी रूखसार सय्यद इरफान (8) शाळा सुटल्यानंतर मोगलपुरा भागातील घरी जाण्यासाठी वळण रस्ता ओलांडत होती. भरधाव इंडिका कारने सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तिला धडक दिली. धडकेने मुलीच्या डोक्यास मार लागला असून सुमन हॉस्पिटलमध्ये तिला दाखल करण्यात आले आहे.
धडक देऊन कारचालक पसार झाला. घटनेनंतर परिसरातील संतप्त नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते अब्दुल कय्युम शेख मुनीर यांच्या नेतृत्वाखली वळण रस्त्यावर एक तास रास्ता रोको आंदोलन केले. अपघातग्रस्त ठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी आंदोलकांनी केली. त्या कारचालकाचा शोध पोलिस घेत आहेत.