आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार अपघातात युवक ठार, पाच मित्रही गंभीर जखमी, सुसाट वेगामुळे घडला प्रकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जखमींना बाहेर काढल्यानंतर कारने पेट घेतला. - Divya Marathi
जखमींना बाहेर काढल्यानंतर कारने पेट घेतला.
औरंगाबाद - खुलताबाद येथील हजरत जरजरी जरबक्ष उरुसाहून घराकडे परत जाताना भरधाव कार नंद्राबादच्या जवळ उलटून झालेल्या अपघातात रोशन गेट परिसरातील १८ वर्षांचा तरुण जागीच ठार झाला तर पाच गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास नंद्राबादजवळ घडली. फैजान सैफुल्ला खान असे मृत युवकाचे नाव आहे. त्याने दहावीची परीक्षा दिली होती. अजहर नम्रुद्दीन शेख (२०,चालक), सोहेल शेख अन्वर शेख (१८), आतीक मिनाज कादरी (१९), फैजान शोएब खान (१७ ), अलीम आमिन जहागीरदार (२०) अशी जखमींची नावे आहेत.
रोशन गेट, मकसूद कॉलनी येथील सहा मित्र शुक्रवारी रात्री एमएच २० बी वाय ८७९३ या कारमधून उरुसाला गेले होते. ते कव्वाली आणि विविध कार्यक्रम पाहून शनिवारी पहाटे घराकडे निघाले होते.अजहर शेख हा कार चालवत होता. सुसाटपण धावणाऱ्या कारवरील ताबा सुटला आणि कार नंद्राबाद गावाजवळ रस्त्यालगत असलेल्या एका मंदिरावर धडकली. यात मंदिर जमीनदोस्त झाले. त्यानंतर कार उलटून जवळच असलेल्या बी फोरयू या बंद ढाब्यासमोर येऊन पडली. नंद्राबाद येथील काही नागरिकांनी जखमींना कारमधून ओढून काढले अाणि जखमींना घाटीत दाखल केले. डाॅक्टरांनी फैजान सैफुल्ला खान मृत झाल्याचे सांगितले. इतर जखमींवर उपचार सुरू आहेत.

सर्वचजण जिवलग मित्र
कारमधील सहाजण जिवलग मित्र आहेत. त्यापैकी फैजान याचा अंत झाला. सकाळची वेळ असल्याने महामार्गावर वाहनांची वर्दळ कमी होती. रस्ता मोकळा असल्याने कार सुसाट चालवल्यामुळे अपघात झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. कार उलटताच स्पार्किंग होऊन पेट घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांना दिली.
बातम्या आणखी आहेत...