आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला वकिलाच्या कारला डंपरची धडक; सेव्हन हिल्स पुलाखाली वाहतूक ठप्प

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जालना रोडवरील सेव्हन हिल्स उड्डाणपुलाखालून जळगाव टी पॉइंटकडे जाणार्‍या महिला वकिलाच्या कारला वाळूने भरलेल्या डंपरने धडक दिली. हा अपघात बुधवारी दुपारी चारच्या सुमारास झाला. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक अर्धा तास ठप्प झाली होती.

उल्कानगरीतील अँड. वैशाली जाधव या आकाशवाणीकडून कारने (एमएच-20-बीवाय-6579) जळगाव टी पॉइंटकडे जात होत्या. सेव्हन हिल्स पुलाखालून जात असताना नूपुर थिएटरसमोर वाळूने भरलेल्या डंपरने (एमएच-12-ईएफ-3959) कारला पाठीमागून धडक दिली. त्यामुळे कारच्या मागील भागाचे प्रचंड नुकसान होऊन कार जागेवर गोल फिरली. प्रचंड घाबरलेल्या अँड. जाधव कारमधून खाली उतरल्या. त्यांना लोकांनी धीर दिला.

दरम्यान, डंपर चालक पसार झाला. पोलिस नियंत्रण कक्षाने अपघाताची माहिती देताच सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अँड. जाधव यांच्या मैत्रिणीने त्यांना सहकार्य केले. पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला. डंपर चालक रावसाहेब नामदेव दोशी (35, रा. चितेगाव, ता. पैठण) यास पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक हरीश खटावकर करत आहेत.