आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजाजनगरात आणखी एक चारचाकी जाळली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - वाळूज महानगरात वाहने जाळणार्‍यांचा उपद्रव पुन्हा सुरू झाला असून आणखी चारचाकी जाळण्यात आली. हा प्रकार शुक्रवारी मध्यरात्री घडला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बजाजनगर परिसरातील पारिजात हाउसिंग सोसायटी येथील आर.एक्स 4/5 या सोसायटीत राहणारे विनोद आनंद चित्ते यांनी त्यांचे चारचाकी वाहन (एमएच 20 सीएच 2886) घरासमोर लावले होते. शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात माथेफिरूने ते पेटवून दिले. यात गाडीच्या मागील भागातील सर्व मशिनरी जळून खाक झाली. गाडीला आग लागल्याचे समजताच सोसायटीतील नागरिकांनी आग विझवली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले.

बजाजनगर येथे 30 जानेवारी 2010 रोजी दुचाकीला आग लावण्यात आली होती. त्यानंतर 16 फेब्रुवारी 2013 पर्यंत दोन वर्षांच्या कालावधीत एकूण 25 दुचाकी व 6 चारचाकी पेटवून देण्याच्या घटना घडल्या होत्या. शुक्रवारी पुन्हा दोन महिन्यांनंतर चारचाकी वाहन जाळण्यात आले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संजय अहिरे करीत आहेत.