आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'द बर्निंग कार'मुळे दांपत्याचा थरकाप, सेव्हन हिल्स उड्डाणपुलाजवळ घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - धावत्या कारने अचानक पेट घेतल्याने कारमधील दांपत्याच्या जिवाचा थरकाप उडाला. ही घटना सोमवारी दुपारी वाजेच्या सुमारास सेव्हन हिल्स उड्डाणपुलाखाली घडली. सिडको अग्निशमन दलाने काही मिनिटांतच आग विझवली. या घटनेमुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.

छावणी येथील नंदकिशोर पवार त्यांची पत्नी शीला इंडिका कारने (एमएच २१ व्ही ८०९१) सेव्हन हिल्स परिसरात आले होते. खरेदी आटोपून नाशिकला रवाना होण्यासाठी ते निघाले असता उड्डाणपुलाखालून जालना रोडवर जाण्यापूर्वीच कारच्या इंजिनमधून धूर िनघत असल्याने पवार यांनी कार थांबवली. काही कळण्यापूर्वीच कारने पेट घेतला. आग लागताच दोघे बाहेर आले. पवार यांनी धावत जाऊन पुलाशेजारीच असलेल्या अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली.

वाहतुकीची कोंडी : अग्निशमनदलाचे एस. के. भगत, संजय कुलकर्णी, व्ही. के. राठोड, सा. ई. भोसले, वाहन चालक अशोक वाघ आग विझविली. यामुळे जालना रस्त्यावर काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. छाया: अरुण तळेकर