आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

69 लाख रुपये चोरीप्रकरणी पोलिसांकडून कारचा डेमो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - बीड बायपास रोडवरील प्लॉटच्या रजिस्ट्रीदरम्यान 4 डिसेंबरला व्यापारी लक्ष्मीकांत धूत (रा. संदेशनगर, गारखेडा परिसर) यांच्या कारची काच फोडून चोराने 69 लाख 10 हजार रुपये लंपास केले होते. या कारचा पोलिसांनी शुक्रवारी डेमो घेतला असून दगडाच्या आठव्या फटक्यात काच फुटल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे.

सिटी चौकच्या पोलिसांनी सारा मोटर्ससमोरील मैदानात स्कोडा कारच्या काचेचा डेमो केला. रजिस्ट्रीसाठी 4 डिसेंबर रोजी धूत यांनी बँकेतून 70 लाख रुपये काढले होते. ही रक्कम त्यांनी स्कोडा फाबिया कारमध्ये ठेवली होती. तेव्हा कारची काच फोडून चोराने रक्कम पळवली होती.

कशासाठी केला डेमो
धूत यांच्या कारमधून ज्या वेळी पैसे चोरीला गेले होते त्या वेळी काचेचे अक्षरश: बारीक तुकडे झाले होते. फुटलेल्या काचेच्या ठिकाणी तशीच हुबेहूब काच लावण्यात आली. त्यानंतर दीड किलो वजनाच्या दगडाने काचेवर चक्क आठ प्रहार करण्यात आले. आठव्या प्रहारात कारची काच अर्धवट फुटली.