आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली भारनियमन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-शहराच्या 66 भागांतील वीजपुरवठा 31 जानेवारी रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आला. त्यामुळे घरगुती वीज ग्राहकांबरोबरच उच्च न्यायालय, एअरपोर्ट, महत्त्वाची हॉस्पिटल्स, उद्योग, शैक्षणिक संस्था, खासगी संस्थेच्या दैनंदिन कामकाजात व्यत्यय आला. दर शुक्रवारी वीजपुरवठा खंडित होत असल्याने याचा 14 हजार वीज ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.
ज्या जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात महसूल जमा होतो, तो भाग भारनियमनमुक्त करण्याचा निर्णय चार वर्षांपूर्वी राज्य शासनाने घेतला होता. मात्र या निर्णयाला जीटीएल कंपनी अपवाद ठरत आहे. विद्युत उपकरणाच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी दर शुक्रवारी शहराच्या 50 ते 60 वसाहतीत सात ते नऊ तास वीजपुरवठा बंद ठेवला जातो. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे.
या भागांतील बत्ती गुल
लक्ष्मीनगर, सह्याद्री हिल्स, शिवाजीनगर, शहानूरवाडी, नाथ प्रांगण, आदित्यनगर, सातारा परिसर, देवगिरी परिसर, प्राइड इग्मा, एन-1, 2, 3, 4, मुकुंदवाडी, चिकलठाणा, रेणुकानगर, नाथ हायस्कूल, जानकी हॉटेल, मेहरनगर, दिशा प्राइड, कबीरनगर, खिंवसरा पार्क, मयूर कॉलनी, शिवाजी कॉलनी, शीतलनगर, केशवनगर, शंभूनगर, स्वामी सर्मथ मंदिर, सूतगिरणी, मयूरबन, इंदिरानगर, सुराणानगर, व्यंकटेशनगर, जालना रोड, गारखेडा परिसर, मोतीलालनगर, नवजीवन कॉलनी, अपना बाजार आदी ठिकाणी वीजपुरवठा बंद होता.
भारनियमन नाही
विद्युत वितरणात अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी दर शुक्रवारी दुरुस्तीसाठी काही तास वीजपुरवठा बंद करण्यात येतो. भारनियमन केले जात नाही. तशी ग्राहकांना पूर्वसूचना दिली जाते. समीर पाठक, जनसंपर्क अधिकारी
जीटीएलची दिशाभूल
आठवड्यात तीन दिवस चार तासांपेक्षा अधिक वेळ वीजपुरवठा बंद असतो. शुक्रवारी दुरुस्तीच्या नावाखाली 8 तास भारनियमन केले जाते. ही सरळ दिशाभूल आहे. जीटीएलला लोक त्रस्त झाले आहेत. मीर हिदायत अली, नगरसेवक
शहरातील 14 हजार वीज ग्राहकांना बसतोय फटका