आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार्लींचा आता शहरात बारा तास पहारा! वाढत्या गुन्ह्यामुळे कामाचा वेळ वाढवला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरात वाढणाऱ्या घरफोड्या, मोबाइल आणि दुचाकी चोरीला आळा घालण्यासाठी चार्ली पथक आता १२ तास गस्तीवर राहणार आहे. या चार्लींचे काम सुरुवातीला आठ तासच होते. मात्र, गुन्हेगारी घटना वाढत असल्याचे पाहून त्यांची गस्त १२ तास करण्यात आली आहे. ही गस्त दोन टप्प्यांत असेल. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी या पथकाची सुरुवात केली होती.
पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले बीट मार्शल बरखास्त करून आयुक्तांनी चार्लीचे पथक स्थापन केले. पथक गुन्हे शाखेशी संलग्न ठेवण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अविनाश आघाव गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक शहरात कार्यरत आहे. सुरुवातीला या पथकास आठ तास ड्यूटी लावण्यात आली होती. सुरुवातीला पथकाने शहरातील गल्ली बोळांत दादागिरी करणाऱ्या, प्रवाशांची छेडछाड करणारे रिक्षाचालक तरुणांचा टार्गटपणा थांबवण्यावर भर दिला. या पथकाने अट्टल गुन्हेगार, मोबाइल चोर पकडून दिले. मात्र काही चार्लींच्या तक्रारी आल्यामुळे पोलिस आयुक्तांनी त्यांना समज दिली. चार्ली शिस्तीचे पालन करीत नसल्याच्या तक्रारी आल्यामुळे त्यांनी पोलिस उपायुक्त संदीप आटोळे यांना १६४ चार्लींना १२ तासांची ड्यूटी करण्याच्या सूचना दिल्या.

त्यांची हजेरी लागणार
सकाळी८.४५ वाजता चार्लीची गुन्हे शाखेत हजेरी देऊन ते संबंधित पोलिस ठाण्यात जाऊन ठाणे अंमलदारासमोर हजेरी लावायची. वाॅकीटाकी, पिस्तूल, ३० जिवंत काडतुसे दाखवल्यानंतरच त्यांची हजेरी लागणार. ठाणे अंमलदाराने चार्ली आलेली नोंद दररोज १० वाजेपर्यंत नियंत्रण कक्षाला कळवावे, असे आदेशात म्हटले आहे. मात्र बारा तास काम करावे लागणार असल्यामुळे त्यांच्यात नाराजीचा सूर निघत आहे.