आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग, करिअरची नवीन वाट!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-12 वीनंतर काय करायचे, हा प्रश्न विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाही पडलेला असतो. इंजिनिअरिंग, मेडिकलशिवाय इतरही क्षेत्रांत आपली आवड शोधण्याच्या प्रयत्नात असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या नवीन वाटा खुणावत आहेत. या क्षेत्रात प्रगतिपुस्तकावरील गुणांपेक्षा व्यवहारज्ञानाला जास्त महत्त्व दिले जाते. शहरातही असे अनेक कोर्सेस आहेत. यापैकी एक म्हणजे एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग.

एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग हा 12 वीनंतरचा अभ्यासक्रम गेल्या चार वर्षांपासून औरंगाबादेत सुरू आहे. या अभ्यासक्रमानंतर मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन (डीजीसीए) यांनी प्रमाणात केलेला विमान दुरुस्तीचा परवाना मिळतो. हा परवाना मिळाल्यानंतर विमान सुविधा पुरवणार्‍या कुठल्याही कंपनीत विद्यार्थी ए.एम.ई. म्हणून काम करू शकतात. अशा अभियंत्यांच्या परवानगीशिवाय विमान ाचे उड्डाण होत नाही. या अभ्यासक्रमात विमानाच्या दुरुस्ती आणि मेंटेनन्सचे प्रशिक्षण दिले जाते. विमानाचे इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल पार्ट कसे तपासायचे, त्यांची दुरुस्ती कशी करायची याचे शिक्षण दिले जाते. विमानात पायलटबरोबर दोन ए. एम. व्ही. इंजिनिअर आवश्यक असतात. देशात 40 ठिकाणी हा अभ्यासक्रम शिकवला जातो. महाराष्ट्रात औरंगाबाद, पुणे, मुंबई, नाशिक आणि बारामती येथे एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंगची प्रशिक्षण केंद्रे आहेत.

यंत्रात रमणार्‍या विद्यार्थ्यांसाठी चांगली संधी
>यंत्रात रमणार्‍या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम म्हणजे एक चांगली संधी आहे. 80 टक्के प्रॅक्टिकल आणि 20 टक्के थेअरी असलेला अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना परिपूर्ण बनवतो. पाच सेमिस्टरनंतर विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंगदेखील मिळते. नवीन क्षेत्रात करिअर करण्याची संधी या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना मिळाली आहे.
-दीपक फुलझेले, चीफ इन्स्ट्रक्टर

असे दिले जाते प्रशिक्षण
>हा 3 वर्षांचा अभ्यासक्रम आहे.
>पीसीएम (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ) ग्रुप घेऊन 12 वी पास आवश्यक आहे.
>3 वर्षांत सहा सेमिस्टर असतात. दर सेमिस्टरला परीक्षा असते.
>मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अशा दोन प्रकारांत हा अभ्यासक्रम शिकवला जातो.
>प्रत्येक बॅचमध्ये 60 विद्यार्थी असतात.
>इंटरनॅशनल एव्हिएशन ऑर्गनायझेशन (आयसीओए) यांनी आखून दिलेल्या नियमानुसार अभ्यासक्रम शिकवला जातो. विविध देशांच्या एव्हिएशन तज्ज्ञांनी हा अभ्यासक्रम तयार केलेला आहे.
>महाराष्ट्र शासन आणि खासगी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हा अभ्यासक्रम राज्यभरात सुरू आहे.
>प्रत्येक सत्रासाठी 40 हजार रुपये शुल्क आहे.
>देश आणि देशाबाहेरील विमान सुविधा पुरवणार्‍या कंपन्यांमध्ये या विद्यार्थ्यांना नोकरी मिळू शकते.