आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अय्युब खान यांंच्यावर गुन्हा दाखल, शंभरवर लोकांना विकले प्लॉट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दुसऱ्याच्या जमिनीवर प्लॉटिंग पाडून ते शंभरवर लोकांना विकून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी काँग्रेसचे नगरसेवक अय्युब खान यांच्यासह तेरा जणांवर सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मूळ जमीन मालकाने याबाबत तक्रार दिल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अॅड. सुशील मुरलीधर बियाणी (४०, रा. पन्नालालनगर) यांच्या तक्रारीनुसार, २०१२ मध्ये त्यांनी सावंगी शिवारातील गट क्रमांक २३१/१ मधील २३ गुंठे जमीन जयकिशोर गांजले यांच्याकडून विकत घेतली होती. या व्यवहारादरम्यान एजंट शेख माजेद शेख इमाम (रा. नायगाव) हा उपस्थित होता. परंतु एप्रिल २०१५ मध्ये माजिद याने बियाणी यांच्याशी संपर्क साधून तुमची २३ गुंठे जमीन मी जयकिशोर गांजलेकडून घेतल्याचे सांगितले. बियाणी यांनी माजिदकडे जमिनीच्या खरेदी-विक्री कागदपत्रांची मागणी केली. परंतु त्याने कागदपत्रे दाखवता उलट पैशाची मागणी करत बियाणींना धमकावले. धमकीकडे बियाणी यांनी दुर्लक्ष केल्याने माजिदसह माजेद खान (रा. मंजूरपुरा) नगरसेवक अय्युब खान न्यायालयात गेले. जमीन वादात अडकावायची नसेल तर २५ लाखांची मागणी केली. पैसे दिल्यास परस्पर जमीन विकण्याची धमकी दिली. ऑगस्ट २०१६ रोजी मुनीर गनी नाईक (५७, रा. नाहिदनगर, कटकट गेट) यांनी बियाणी यांच्या घरी जाऊन त्यांच्या सावंगी शिवारातील जमिनीची चौकशी करत तुमच्या १७ गुंठे जमिनीवरील १०२०० चौरस फूट जमीन विकत घेतल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात १५ मार्च २०१६ रोजी झालेल्या जमीन खरेदी खताची प्रतही दाखवली. तेव्हा बियाणी यांच्या मालकीची जमीन बोगस व्यक्ती कागदपत्रे तयार करून परस्पर विकल्याचे उघड झाले. त्यामुळे नाईक यांनी सिटी चौक पोलिस ठाणे गाठत शेख माजेदविरोधात तक्रार दिली. त्यानंतर माजेदवर गुन्हा दाखल होऊन त्याची रवानगी हर्सूल कारागृहात झाली. बियाणी यांची संपूर्ण जमीन अनेकांना विकून नगरसेवक अय्युब खान यांच्यासह इतरांनी करोडो रुपयांचा घोटाळा केल्याचे समोर आल्याने १९ ऑगस्ट रोजी बियाणी यांनी सिटी चौक पोलिस ठाण्यात अकरा जणांविरोधात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक ए. के. पवार पुढील तपास करत आहेत.

हे आहेत आरोपी : शेखमाजिद नगरसेवक अय्युब खान यांच्यासह शेख कलीम, शेख दस्तगीर, माजेद खान, शेख मुक्तार (रा. नायगाव), मोहंमद शकील (रा. फकीरवाडी), गुलाम दस्तगीर (रा. संजयनगर), भाऊसाहेब बाळाजी धीवर (रा. एकता कॉलनी) मोहंमद मसी मोहंमद ख्वाजा (रा. चेलीपुरा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाईक यांच्या तक्रारीनंतर बियाणी यांनी त्यांच्या जमिनीची पाहणी केली असता ती १०० पेक्षा अधिक लोकांना विकल्याचे निदर्शनास आले. तेथे २० बाय ३० चे प्लॉट पाडून चतु:सीमाही तयार केली. प्लॉट खरेदी करणाऱ्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी नगरसेवक अय्युब खान यांची भेट घेतली असता त्यांनी काय करायचे ते करा, अशी धमकी दिल्याचे सांगितले.
बातम्या आणखी आहेत...