आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Case File Against Youth For Girl Photos Misuse On Facebook

फेसबुकवर युवतीची बदनामी; तरुणावर गुन्हा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज- बजाजनगर परिसरात राहणार्‍या 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीच्या नावे फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करून त्यावर तिचे छायाचित्र अपलोड करून बदनामी करणारा मजकूर टाकण्यात आला. या प्रकरणी तरुणीच्या आत्याच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन गणेश धुरंदर (रा.चंदिकापूर, ता.अचलपूर, जि.अमरावती) असे आरोपीचे नाव आहे. वाळूज परिसरातील महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी आलेल्या या युवतीची बदनामी करण्याच्या हेतूने सचिनने हा प्रताप केला. हा प्रकार कळताच तरुणीने 14 नोव्हेंबरला ही बाब पालकांना कळवली. अधिक माहिती घेतली असता अकाउंट तिच्या आत्याचा मुलगा सचिन याने सुरू केल्याचे समोर आले. याबाबत तरूणीने सातारा पोलिसांत तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक बी. के. कंजे करत आहेत.