आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्किंग शुल्क आकारणाऱ्या प्रोझोनच्या कंत्राटदारावर गुन्हा; महाविद्यालये, इतर पार्किंगचालकांना नोटिसा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - व्यावसायिक स्थळ असूनही ग्राहकांकडून अव्वाच्या सव्वा पार्किंग शुल्क घेणाऱ्या प्रोझोन मॉलच्या वाहनतळ कंत्राटदारावर गुरुवारी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नागरिकांकडून पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. 
 
आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीकांत नवले यांनी ३१ ऑगस्ट रोजी प्रोझोन मॉल येथे जाऊन चौकशी केली. तेव्हा प्रोझोन मॉलने वाहनतळासाठी सेक्युलर पार्किंग सोल्युशन प्रा. लि. यांच्यासोबत करार केल्याचे समोर आले. करारानुसार प्रोझोन मॉलतर्फे वाहनधारकांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम पार्किंगसाठी वसूल केली जात होती. वाहनतळ मालकाला अशा प्रकारे शुल्क वसूल करण्याचा कुठलाही अधिकार नाही. तसेच ग्राहकांना देण्यात येणाऱ्या पावतीवर सेवा कराचा उल्लेख नसल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर नवले यांनी स्वत: फिर्याद देत एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 
 
अकारण पार्किंग शुल्क गुन्हाच 
शहरातीलअनेक खासगी तसेच सरकारी जागांवर पार्किंगसाठी शुल्क आकारले जाते. यात महाविद्यालय, रुग्णालये, न्यायालय, निराला बाजार, औरंगपुरा येथील काही ठिकाणांचा समावेश आहे. यातील सर्व वाहनतळ चालकांना नोटिसा पाठवून खुलासा मागवण्यात आला आहे. व्यावसायिक जागा किंवा व्यावसायिक ठिकाणांवर ग्राहक येतात. ग्राहक ही त्यांची गरज असते. तरीही त्यांच्याकडून अवैधरीत्या मोठी रक्कम वसूल करणे हा गुन्हा असल्याचे नवले यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...