आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार खैरेंविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा, आमदार शिरसाटांसह ४० जणांवर गुन्हे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज (जि. औरंगाबाद) - औरंगाबादेत धार्मिक स्थळांवरील अतिक्रमण हटावच्या वेळी तहसीलदार रमेश मुनलोड यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केल्याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट यांच्यासह ४० जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवला आहे. हा अजामीनपात्र गुन्हा ठरतो.

उच्च न्यायालयाच्या आदेशाने बजाजनगरात एमआयडीसीच्या जागेवरील बालाजी मंदिर, संत नरहरी महाराज मंदिर, साईबाबा मंदिर, चर्च, हनुमान मंदिरांची अतिक्रमणे हटवण्यात आली. त्यावरून खैरे यांनी धक्काबुक्की केली होती. त्यांच्यासोबत आमदार संजय सिरसाट, नगरसेवक नंदकुमार घोडेले, शिवाजी बनकर, संजय शहाणे, तालुकाप्रमुख बप्पा दळवी, मीरा पाटील, जयश्री घाडगे आदी होते. मुनलोडसह ५० अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी तशी तक्रार दिली होती.