आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदिवासींना जात वैधता प्रमाणपत्रे टाळणा-या अधिका-यांवर कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आदिवासी कोळी समाजातील लोकांना जात वैधता प्रमाणपत्रे देण्यास मुद्दाम टाळाटाळ करणा-या दोषी अधिका-यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा केंद्रीय आदिवासी विकासमंत्री जोएल ओराम यांनी रविवारी दिला.

मराठवाडा आदिवासी कोळी जमातीचा मेळावा आज सिडकोतील संत तुकाराम नाट्यमंदिरात झाला. या वेळी ओराम यांनी महाराष्ट्र ात कोळी समाजावर अन्याय झाला असून तो दूर करणार असल्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले, कोळी समाजात महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी या जमातीचे लोक डोंगराळ प्रदेशातील अनेक जिल्ह्यात राहतात. या समाजातील सर्वांचा समावेश अनुसूचित जमातीत करावा यासाठी आंदोलने करण्यात येत आहेत. तसेच महादेव कोळी यांचा एसटीमध्ये समावेश केला असला तरी त्यांना जात वैधता प्रमाणपत्र दिले जात नाही. त्यामुळे आज 30 ते 40 हजार अर्ज प्रलंबित आहेत.

वाजपेयी सरकारच्या काळात मंत्री असताना आपल्या कार्यकाळात 270 जाती-जमातींसंदर्भात संशोधन करण्यात आले. त्याच वेळी कोळी समाजाचा प्रश्न सुटला असता, असे ते म्हणाले. पण तरीही लवकरच हा प्रश्न सोडवण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.