आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cast Certificate Issue In Zp Election Aurangabad

जात वैधतेसाठी अर्जांचा पाऊस

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला असून जय्यत तयारी सुरू केली आहे. उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र जोडणे सक्तीचे असल्याने समाजकल्याण विभागाकडे हजारहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. सर्वच अर्जांचा निपटारा युद्धपातळीवर सुरू आहे.
यापूर्वीच्या निवडणुकीत जात वैधता प्रमाणपत्र उमेदवारी अर्जासोबत देणे सक्तीचे नव्हते. केवळ राखीव जागांवर निवडणूक लढवणा-यांना जात प्रमाणपत्र जोडावे लागत होते. त्यानंतर त्याची पडताळणी होत होती. निवडून आलेल्यांपैकी अनेकांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्या ठिकाणी पोटनिवडणूक घ्यावी लागत होती. हा त्रास कमी व्हावा,यासाठी निवडणूक आयोगाने गेल्या वर्षापासून यामध्ये बदल केला. उमेदवारी अर्जासोबतच जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांची धावपळ उडाली आहे.
त्रुटींचा प्रश्न कायम - पडताळणी करताना अनेक अर्जांमध्ये प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रांची उमेदवारांनी पूर्तता न केल्याने त्रुटींचा प्रश्न कायम आहे. प्रलंबित प्रकरणी उमेदवारांनी कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाच्या सहआयुक्त जयश्री सोनकवडे यांनी केले आहे.