आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cast Wise Registration Complete In Aurangabad City

औरंगाबाद शहरातील जातनिहाय जनगणनेचे काम पूर्ण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सध्या शहरासह जिल्ह्यात सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणनेचे काम सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने ही जनगणना अयोग्य असल्याचे म्हटले असले तरी त्यावर केंद्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र अद्याप कोणताच आदेश केंद्र सरकारने दिला नसून शहरातील सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. याद्या तयार करून प्रसिद्ध करण्यासाठी शासनाकडे परवानगी मागितली आहे.

शासनाकडून करण्यात आलेल्या शिरगणतीनंतर शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट लाभार्थींना देण्यासाठी तसेच योग्य उमेदवारांच्या जातनिहाय, आर्थिक आणि सामाजिक माहितीसह कुटुंबाची माहिती घेण्यासाठी जातनिहाय जनगणना २०११ पासून केली जात आहे. त्यामुळे योजना तयार करत असताना वरील सर्व बाबींचा विचार करून आवश्यक अशीच फायदेशीर योजना निर्माण होऊ शकते.
मात्र, हे सर्वेक्षण सुप्रीम कोर्टाने रद्दबातल ठरवले आहे. त्यावर केंद्राकडून सध्या तरी कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे जिल्ह्यात आणि शहरात सर्वेक्षण सुरूच असून शहरातील सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. त्यात २१७७ गटांची माहिती घेण्यात आली आहे. त्याचबरोबर गंगापूर ग्रामीणच्या १५२, पैठण ग्रामीण २० गट, पैठण नगर परिषद दोन तर कन्नड ग्रामीणमध्ये एका गटाच्या याद्या छपाई करून त्या प्रकाशित करण्यासाठी शासनाला परवानगी
मागितली आहे.

यादी प्रकाशित झाल्यावर हरकती, दावे
संभाव्य याद्या प्रकाशित केल्यानंतर त्यावर हरकती, दावे मागवण्यात येणार आहेत. त्यात नावात, पत्त्यात बदल, जातीचे प्रकरण आणि इतरांवर आक्षेप घेण्याचे चार अर्ज असतील. त्याद्वारे हरकती व दावे घेऊन दोन महिन्यांत ही प्रक्रिया पार पडल्यानंतर अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात येणार आहे.

केंद्र शासनाकडून कोणतेच आदेश नाहीत
^न्यायालयाने निकाल दिला असला तरी, त्यावर कोणताच निर्णय अद्याप केंद्र शासनाकडून घेण्यात आला नाही. त्यामुळे ही प्रक्रिया अविरतपणे सुरू आहे. एस. बी. लांगोरे, प्रकल्प संचालक