आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातीय समीकरणांवर काँग्रेसचे घोडे अडले, अध्यक्षपदांच्या नियुक्त्या रखडल्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - हिवाळी अधिवेशन संपताच काँग्रेसचे जिल्हा शहराध्यक्ष जाहीर होतील, असे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी जाहीर केले होते; परंतु प्रत्यक्षात अजून निर्णय होऊ शकला नाही. जिल्हाध्यक्षपदी आमदार अब्दुल सत्तार यांची वर्णी लागणार अशी चिन्हे असून ते जर जिल्हाध्यक्ष होत असतील शहराध्यक्ष गैरमुस्लिम असावा, असा मतप्रवाह पुढे आल्याने या दोन्हीही नियुक्त्या रखडल्याचे समोर आले आहे.

लोकसभा, विधानसभा तसेच महानगरपालिका अशा तिन्हीही निवडणुकांत शहर तसेच जिल्ह्यात काँग्रेसला जबर फटका बसला. त्यामुळे पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी नव्या चेहऱ्यांकडे जिल्हा शहराची धुरा देण्याची तयारी श्रेष्ठींनी चालवली आहे. त्यात जिल्ह्याचे नेतृत्व सत्तार यांच्याकडे देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. सत्तार यांच्याकडे जिल्ह्याचे नेतृत्व देणार असाल तर शहराचे नेतृत्व देताना जातीय समीकरणाचा विचार व्हावा. थोडक्यात शहराध्यक्ष मुस्लिम असू नये, असा जवळपास सर्वांचाच आग्रह आहे. मात्र, शहरातील समीकरणाचा विचार करता शहराध्यक्ष हा मुस्लिमच असावा, असा काहींचा रेटा आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदी अन्य कोणाचा विचार व्हावा, असा सूर लावला जातो.

शहरात एमआयएम या पक्षाने काँग्रेसला चीत केले. त्यांना शह द्यायचा असेल तर येथेही मुस्लिम चेहरा हवा आहे; परंतु जिल्हाध्यक्षही मुस्लिम जिल्हाध्यक्षही मुस्लिम ही बाब पक्षातील काहींना मान्य नाही. परिणामी, तोडगा निघू शकलेला नाही. म्हणून गेल्या महिनाभरापासून यावर फक्त चर्चाच सुरू आहे.

दोन मतप्रवाह असल्यामुळेच जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. दुसरीकडे, पक्षाला सध्यातरी कोणतीही घाई नाही. कारण नजीकच्या काळात निवडणुका नाही. काँग्रेसला आता जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी करायची आहे.

चर्चेतील चेहरे
सत्तारजिल्हाध्यक्ष झाल्यास शहराध्यक्षपदासाठी माजी आमदार डॉ. कल्याण काळे, काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष विलास औताडे यांच्यातून एकाची वर्णी लागू शकते.
बातम्या आणखी आहेत...