आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादच्या डॉक्टरवर गर्भलिंगप्रकरणी कारवाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गर्भलिंग चिकित्सा करणार्‍या औरंगाबाद येथील रेडिओलॉजिस्ट डॉ. अनिल पाटील यांच्या सोनोग्राफी सेंटरवर विभागीय दक्षता पथकाने सापळा लावून तेथील सोनोग्राफी मशीन जप्त केले.

या पथकाने 22 फेब्रुवारी रोजी गर्भवती महिलेला एका पंचासमवेत सोनोग्राफी करण्याकरिता डॉ. पाटील यांच्याकडे पाठवले. त्या महिलेने सोनोग्राफी केल्यावर लिंगनिदान करावे, असा आग्रह डॉक्टरांकडे धरून त्यासाठी 40,000 रुपये देण्याची तयारी दाखवली. त्यावर डॉ. पाटील यांनी दुसर्‍या दिवशी 20,000 रुपये घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार, दक्षता पथकाने सापळापूर्व पंचनामा करून पंचासमवेत महिलेस डॉ. अनिल पाटील यांच्याकडे पाठवले. डॉक्टराने ते पैसे घेऊन लिंगनिदान केले. त्याच वेळी विभागीय दक्षता पथकातील अधिकार्‍यांनी त्वरित धाड मारून डॉक्टर पाटीलने घेतलेले 20,000 रुपये जप्त केले. तसेच सोनोग्राफी मशीनही सील केले. याप्रकरणी डॉ. पाटील याच्याविरुद्ध रीतसर फिर्याद दाखल करण्यात आली.